एसटी बसचा भीषण अपघात; अनेक प्रवासी जखमी

बातमी शेअर करा...

मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर चाळीसगाव एसटी बसचा भीषण अपघात झाला असून, या अपघातात 27 प्रवासी जखमी झाले आहेत. एसटी बसने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. सर्व जखमींना पिंपळगाव बसवंत येथील शासकीय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, बसचे ब्रेकफेल झाल्यामुळे अपघात झाला.

चाळीसगाव आगाराची एसटी (क्रमांक एम एच 40 एन 9817) बस चाळीसगावहून कल्याणला जात असताना हा अपघात झाला. पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर 13 नंबर लेनवर बसचे ब्रेक फेल झाले आणि बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने उभ्या ट्रकला धडक दिली. यात 27 प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी खाजगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंबई-आग्रा महामार्गावर एसटी महामंडळाच्या बंद झालेल्या गाड्यांमुळे प्रवाशांना सतत त्रास सहन करावा लागतो. एसटीच्या अनेक गाड्या जुन्या झाल्यामुळे लांबच्या प्रवासात धोका निर्माण होतो. प्रशासनाने या जुन्या बसेसचे नियोजन करणे गरजेचे आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम