नगरदेवळा येथे मोटरसायकल चोरी: अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

पाचोरा: नगरदेवळा येथे अज्ञात चोरट्याने ३०,००० रुपये किंमतीची मोटरसायकल चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरदेवळा येथील रहिवासी नरेंद्र दत्तुसिंग राऊळ यांच्या घरासमोर उभी असलेली मोटरसायकल (क्रं. एम. एच. डी. एच. ३४२०) २२ मे सायंकाळी ७:३० ते २३ मे सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरी केली. नरेंद्र राऊळ यांच्या तक्रारीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल मनोहर पाटील करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम