राज्याचे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार जेजुरी गडावर !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ ऑगस्ट २०२३ | राज्यातील शिंदे, फडणवीस व पवार सरकारचे राज्यभर शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरु असून आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे दाखल झाले. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या कर्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. दरम्यान या कार्यक्रमाच्या आगोदर शिंदे-फडणवीस आणि पवार या तिघांनी जेजुरी गडावर जाऊन खंडोबाचे दर्शन देखील घेतलं.

७ ऑगस्ट रोजी शासन आपल्या दारी या कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी या नेत्यांनी खंडोबाचे दर्शन घेतलं. या पूर्वी दोन वेळा जेजुरीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र काही कारणास्तव तो रद्द करण्यात आला होत आहे. या आधी दोन वेळा जेजुरीती या कार्यक्रमाचे नियोजन केले होते, परंतु त्यावेळेस कार्यक्रम झाला नव्हता, त्यामुळे आता आज होणाऱ्या या कार्यक्रमाची तयारी चोख करण्यात आली आहे. या कार्यक्रम प्रसंगी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कार्यक्रमस्थळाला भेट दिली होती. या ठिकाणी विविध सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी दालने देखील उभारण्यात आली आहेत. राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ हा नागरिकांना एकाच ठिकाणी मिळवा यासाठी हा ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबवण्यात येतो. विद्यमान राज्य सरकारकडून राज्यातील अनेक शहरात यापूर्वी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रमानिमीत्त कार्यक्रम घेतले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम