राज्य उत्पादन शुल्क विभागास संविधान दिनाचा विसर ; संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची भारतीय पत्रकार संघाची मागणी

बातमी शेअर करा...

जळगांव | प्रतिनिधी | जळगांव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागास संविधान दिनाचा विसर पडला असून त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी निलंबनाची.

कारवाई करावी अशी मागणी भारतीय पत्रकार संघातर्फे करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री यांच्याकडे मागणी करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा कार्यालय व चाळीसगांव कार्यालय येथे 26 नोव्हेंबर 2023 रोजी संविधान दिन साजरा करणे बाबत शासनाचे आदेश असताना देखील अधीक्षक व निरीक्षक यांनी मुख्यालयी हजर न राहता शासनाच्या आदेशाचा अवमान केला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाची सदर अधिकाऱ्यांना विसर पडला असून हे अधिकारी मुख्यालयी नसल्याचे दिसून आले. आमच्या प्रतिनिधीने जळगांव व चाळीसगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयास भेट दिली असता तेथे कोणीही हजर नव्हते.

भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी 26 नोव्हेंबर 2015 रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 24 नोव्हेंबर 2008 ला आदेश काढून 26 नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.

सदर अधिकाऱ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान न करता एक प्रकारे अवमान केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी भारतीय पत्रकार संघातर्फे होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम