
दै. बातमीदार । १२ ऑक्टोबर २०२२ । राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक आधार बळकट करणे यास केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या कृषीविषयक योजना सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि गरजू शेतकऱ्यांना त्याचा लाभ देणे याला प्राधान्य द्यावे. असे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले.
मंत्रालय दालनात मंत्री सत्तार यांनी केंद्र पुरस्कृत योजना, राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी विविध संचालकांनी त्यांच्या विभागाचा आढावा सादर केला. सत्तार म्हणाले की, शेतकऱ्यांना बळकट करताना कृषी योजनांची अंमलबजावणी करताना योग्य लाभार्थी निवड होईल.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम