जर तो गुन्हा असेल तर मी तर वारंवार करणार ; सुषमा अंधारेंचे शिंदे गटावर टीकास्त्र

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ ऑक्टोबर २०२२ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सुषमा अंधारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, सत्य मांडणे हा गुन्हा असेल तर होय आम्ही गुन्हेगार आहोत आणि हा गुन्हा आम्ही वारंवार करणार, असे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, आमच्यावर गुन्हा दाखल झाला याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. असे होणे अपेक्षितच होते. त्यासाठी आम्ही मानसिक तयारी केली आहे. तसेच, ठाण्यातील महाप्रबोधन मेळाव्यात मी पंतप्रधान मोदींची नक्कल केली नाही. तर, मोदींनी जनतेला कोणकोणती आश्वासने दिली होती, त्याची माहिती दिली आणि त्यावर नंतर टीका केली. मला शक्य असते तर मी मोदींचे फुटेजच दाखवले असते.
अंधारे म्हणाल्या, केंद्रात सत्तेत आल्यानंतर दरवर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देईल, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकले जातील, काळे धन देशात परत येईल, अशी अनेक आश्वासाने मोदींनी दिली. मात्र, यापैकी एकही आश्वासन मोदींनी पूर्ण केले नाही. माझ्या भाषणात मी त्यावरच मोदींना सवाल केले होते व सत्य काय, हे सांगितले होते. प्रश्न विचारणे, सत्य मांडणे हा गुन्हा असेल तर हा गुन्हा मी वारंवार करणार आहे.

अंधारे म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले त्याच दिवशी ठाण्यात शिवसेनेचा महाप्रबोधन मेळावा झाला. शिवसेनेचे नाव, चिन्ह गोठवले तरी मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली होती. कदाचित ही गर्दी पाहूनच शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली असेल. त्यामुळेच आमच्याविरोधात तक्रार केली गेली असेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम