मनोहर कुलकर्णी उर्फ भिडेंच्या निषेधार्थ महाराष्ट्र माळी महासंघाचे निवेदन

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी
भडगाव तालुका महाराष्ट्र माळी महासंघ व विविध संघटनांच्या पदाधिकारीनि तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन भिडे गुरुजी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे यांनी मागील काही दिवसापूर्वी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबत अवमानकारक वक्तव्य केले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल देखील अपमान कारक वक्तव केले होते. महापुरुषांचा अपमान करून समाजातील जनतेच्या भावना दुखवण्याचे वाईट कृत्य करणाऱ्या या वाचाळवीर मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे याच्यावर योग्य ती कारवाई करून त्याला तुरुंगात टाकण्याची मागणी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदनाद्वारे पदाधिकाऱ्यांनी केली तसेच यावेळी भिडे चा निषेध करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र माळी महासंघ जिल्हाध्यक्ष श्याम पाटील सर, जेष्ठ पत्रकार शिवदास महाजन, माळी समाज अध्यक्ष साहेबराव महाजन, माजी जिल्हाध्यक्ष दिनेश पाटील, व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष नितीन महाजन, प्रदीप महाजन, विजय महाजन, तालुका अध्यक्ष दीपक माळी, दगडू माळी, समता परिषद तालुका अध्यक्ष भानुदास महाजन, भगवान महाजन, शहर अध्यक्ष अरुण महाजन, समता परिषद शहर अध्यक्ष भिकन महाजन, गोकुळ महाजन, शिवसेना उपजिल्हाप्रमुख (ऊ.बा.ठाकरे) दीपक पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख जे. के. पाटील, युवक प्रमुख माधव राजपूत, प्राचार्य सुरेश रोकडे सर, गणेश महाजन, धोंडू मोरे, वाल्मीक महाजन, शरद महाजन, भूषण महाजन , सुरेश महाजन, मांगो महाजन, चेतन पाटील, दिलीप महाजन, दत्तू माळी, देविदास महाजन, मुकुंदा माळी , रमेश महाजन, धनराज पाटील, अर्जुन माळी, विजय महाजन, राजेंद्र परदेशी , ज्ञानेश्वर महाले, गोरख रघुनाथ माळी , संजय माळी, युवराज पाटील, माजी सरपंच दीपक माळी, अजय महाजन सरपंच पिंपरखेड, संजय महाजन, किरण पाटील सह मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते*

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम