मोठी बातमी : देशातील ७ पोटनिवडणूक जाहीर !

बातमी शेअर करा...

बातमीदा | ८ ऑगस्ट २०२३ | राज्यातील दोन लोकसभा मतदार संघाच्या जागा रिक्त असतांना देशभरातील ७ ठिकाणी रिक्त झालेल्या विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. मात्र पोटनिवणुकीत महाराष्ट्रातील दोन्ही मतदार संघाचे नाव नाही.

गिरीश बापट यांच्या निधनाने पुण्याची जागा रिक्त झाली असून बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे चंद्रपूर लोकसभेची जागा रिक्त आहे. लोकसभा निवडणुकीला आता एक वर्षाहूनही कमी कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पोटनिवडणूक होणार नाही, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र निवडणूक आयोगाने पुणे आणि चंद्रपूरबाबत काहीही घोषणा केली नसल्याने या दोन्ही जागांवर निवडणूक होणार नाही, हे जवळपास स्पष्ट झालं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम