चिंचखेडा येथील घटनेच्या निषेधात भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या वतीने चोपडा तहसीलदारांना निवेदन

बातमी शेअर करा...

जामनेर: जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाने चोपडा तहसीलदारांना निवेदन दिले. या मोर्चाचे नेतृत्व भाजपा नेते प्रदीप पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष धनराज पाटील, तालुका अध्यक्ष मगन बाविस्कर, लोकसभा विशेष संपर्क प्रमुख रवींद्र मऱ्हाटे, पंचायत समिती उपाध्यक्ष दिपक बाविस्कर, पंचायत समिती सदस्य प्रविण बाविस्कर, तालुका सरचिटणीस राहुल जाधव, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष भाऊराव माळी, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष जगन्नाथ पाटील, तालुका सरचिटणीस घनश्याम पाटील यांनी केले.

या घटनेतील नराधमाला फाशी देण्याची मागणी मोर्चाच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात बोलताना मगन बाविस्कर यांनी नराधमाला कठोर शिक्षा व्हावी असे मत व्यक्त केले.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात, जामनेर तालुक्यातील चिंचखेडा गावातील ६ वर्षीय आदिवासी भिल्ल बालिकेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. पीडित बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात कठोर कारवाई करून दोषींना फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी, जिल्हा सरचिटणीस कैलास जोशी, तालुका अध्यक्ष, जामनेर तालुका उपाध्यक्ष भाऊराव माळी, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष जगन्नाथ पाटील, तालुका सरचिटणीस घनश्याम पाटील उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम