गो. से. महाविद्यालयात दोन दिवसीय वार्षिक दिन सोहळ्यात विद्यार्थ्यांनी गाजविला रंगमंच

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ सेप्टेंबर २०२२ । गो. से. महाविद्यालयाचा “अमृत महोत्सव” तथा विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष स्व. अँड. शंकररावजी उपाख्य भाऊसाहेब बोबडे यांच्या १०७ व्या जयंती उत्सवा निमित्त महाविद्यालयात दोन दिवसीय वार्षिक दिन सोहळ्याचे आयोजन महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात करण्यात आले आले होते. यामध्ये विविध स्पर्धांना सुरुवात झाली. यामध्ये सुगम संगीत, शास्त्रीय गायन, भारतीय समूहगान, एकांकिका, स्किट व माईम, वाद विवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वेस्टन गायन, ताल वाद्य, मिमिक्री, रंगोली, प्रश्न मंजुषा, कवी संमेलन, रांगोळी स्पर्धा, पुष्पगुच्छ ही स्पर्धा, पेंटिंग, नृत्य स्पर्धा, मातीतून कलाकृती, कचर्यातून कला कृती, प्रश्नमंजुषा, जी. एस. १ मिनिट, पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, सुगम संगीत स्पर्धा, अशा विविध कला प्रकारामध्ये विद्यार्थी तरुण-तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. वार्षिक दिवसाच्या निमित्ताने विविध कला प्रकारचे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली व दाद मिळविली.

 

यावेळी सभागृह टाळांच्या आवाजाने कडाडून गेला होता. विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांमध्ये सहभाग घेऊन कलामंच गाजविला. या सोहळ्यात विविध कला प्रकार पाहण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रेक्षक व रसिकांनी एकच गर्दी केली होती. वार्षिक दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर, उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल उबाळे, प्रा. डॉ. एम. ओ. वानखडे (समन्वयक अमृत महोत्सव समीति),प्रा. डॉ. हनुमंत भोसले (सहसमन्वयक अमृत महोत्सव समीति), सदस्य वार्षिक दिन महोत्सव समिती प्रा. डॉ. व्ही. आर. गव्हाळे, प्रा. डॉ. पी. ई. आजमीरे, प्रा. डॉ. ए. व्ही. पडघन, प्रा. डॉ. ए. डी. भोसले, प्रा. डॉ. डी. एन. व्यास, प्रा. डॉ. डी टी आढाव, तसेच विद्यार्थी संघाचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम