हिंस्र प्राण्याने पाडला पशुधनाचा फडशा; ग्रामस्थांमध्ये पसरली दहशत

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ सप्टेंबर २०२२ । एरंडोल येथे हिंस्र प्राण्याने पाच जनावरांचा फडशा पडल्याने ग्रामस्थ कमालीचे घाबरलेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील जवखेडेसीम येथे सोमवार (दि.२६) रोजी रात्रीच्या सुमारास संजय पाटील यांच्या गावानजीकच्या शेतीत ही घटना घडली.

पाटील यांच्याकडे १० ते १२ पाळीव प्राणी आहेत. पशुपालन करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आज मंगळवारी नेहमीप्रमाणे ते गायीचे दूध काढण्यास गेले असता, हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी ताबडतोब याबाबतची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील यांना दिली.

दरम्यान, शिवसेना तालुकाप्रमुखांच्या माहितीवरून वनरक्षक विजय माळी, वनमजूर रविंद्र पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत नागने (आडगाव) यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. वन्य प्राण्याच्या या हल्ल्यामुळे शेतकरी संजय पाटील यांचे पाच लाखांपर्यंतचे नुकसान झाले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम