
दै. बातमीदार । १४ फेब्रुवारी २०२३ । चोपडा तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार केल्या प्रकरणी चोपडा शहर पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यातील संशयितांना पोलीसांनी तात्काळ अटक करण्यात आली आहे दरम्यान एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे गुन्हे दाखल असताना तोवरच अतिदुर्गम भागातील देवझिरी शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याची घटना घडली असुन अधिक्षक सचिन गडे यांना तात्काळ निलंबित केले नाही तर रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे आदिवासी संघटना चे पदाधिकारी यांनी सांगितले आहे संबधित शिक्षक रजेवर न जाता शाळेतून पसार झाला आहे असुन दि. 9 फ्रेबुवारी रोजी गैरहजर असल्याची नोंद सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांनी घेतली आहे.
तालुक्यातील देवझिरी येथे दि.5 फ्रेबुवारी रोजी गावात देवीची यात्रा होती या दिवशी अधीक्षिका ए जे कोळी हे रजेवर गेले होते तसेच निर्वासी जमाल बारेला महिला कामाठी ह्या जेवण करायला घरी गेले होते दि. 5 फ्रेबुवारी चा दिवसी याचा फायदा घेत शाळेचे अधीक्षक सचिन अशोक गडे हे रात्री सुमारे आडे आठ वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत तंलिंन होऊन मुलींच्या वस्तीगृहात प्रवेश करून जेथे मुली कपडे बदली करत असताना.त्याच ठिकाणी त्यांच्या जवळ पोहोचले व मुलींना दहा मिनिटांसाठी माझ्यासोबत यात्रेत चला असे लज्जास्पद शब्द बोलू लागले अधीक्षक गडे, हे मुलींच्या अंगावर हात फिरवत अपमानापद शब्द बोलू लागले. हे पाहून तेथील सर्व मुली घाबरल्या व तेथून अधीक्षक गडे यांना बाहेर निघण्यास विनंती करू लागल्या तरी देखील अधीक्षक गडे .तेथून जाण्यास तयार नव्हते व आमच्या मनात खूप भीती निर्माण झाली होती असे प्रत्यक्ष प्रस्तुत प्रतिनिधी ला सागितले अधीक्षिका अर्चना कोळी मुख्यालयी राहतात पन ते रजेवर होत्या व इतर कोणतेही कर्मचारी तिथं नसल्याच्या फायदा घेऊन अधीक्षक गडे. मुलींच्या चेंजिंग रूम मध्ये प्रवेश करून मुलींचे कपडे हातात घेऊन लज्जास्पद कृत्य करू लागले. शिक्षकांना गुरुचा दर्जा दिला जातो विद्यार्थी घडवतो परंतु तालुक्यात एकच आठवड्यात शिक्षकानी बलात्कार व विनयभंगाचा घटना उघडकीस आल्यामुळे पालकांची शिक्षकांवरची विश्वासार्हता उठत चालली आहे.
शासकीय अधिकारी कर्मचारी हे मुख्यालयी राहणे हे बंधनकारक असून शासनाने तसा जि आर आमलात आणला असला तरी या आदेशाला अधिकारी कर्मचारी केराची टोपली दाखवत आहे हे ह्या विनयभंगाचा प्रकरणावरून दिसुन आले आहे.
या घटनेची चौकशी करण्यासाठी यावल प्रकल्पाचे प्रशांत माहुरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी यावल, मनिषा सुलताने कनिष्ठ विस्तार अधिकारी यावल, हे देवझिरी येथील आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थीनीनी मुख्याध्यापक याच्याकडे अधीक्षक सचिन गडे याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी लेखी अर्ज देऊन करण्यात आली आहे त्या अनुशंगाने यावल आदिवासी प्रकल्पाचे वरील दोघे अधिकारी यांनी देवझिरी शासकीय आश्रम शाळेत येवून सर्व घटनेची माहिती करुन घेतली असुन संबधित शिक्षकावर निलंबित करण्याचा प्रस्ताव तात्काळ अप्पर आयुक्त नाशिक येथे पाठविण्यात आला आहे अशी माहिती सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांनी दै बातमीदार शी बोलतांना दिली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम