मायग्रेनचा होतोय त्रास ; वाचा सविस्तर !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २२ ऑगस्ट २०२३

देशातील अनेक लोकांना मायग्रेन या आजाराचा मोठा त्रास होत असतो. त्यात देखील या आजाराने अनेक महिला देखील त्रस्त असून ते नेहमीच यावर उपचार करीत असतात. ज्यामध्ये डोक्याच्या एका भागात तीव्र वेदना होते आणि त्याबरोबर मळमळ, उलट्या, अस्वस्थता यांसारख्या समस्या असू शकतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, मायग्रेनची डोकेदुखी दीर्घकाळ राहिल्यास त्यामुळे अनेक गंभीर परिस्थितीही उद्भवू शकते. मायग्रेनची वेळीच काळजी घेतली नाही तर हार्ट अटॅक आणि स्ट्रोक सारख्या गंभीर समस्या कशा निर्माण होतात या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

मायग्रेनमुळे होणाऱ्या समस्या
संशोधनात हे सिद्ध झाले आहे की, मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका जास्त असतो. कारण मायग्रेन आणि हृदयविकाराचा झटका या दोन्हीमध्ये रक्तवाहिन्यांमधून रक्तपुरवठा योग्य प्रकारे होत नाही आणि त्यामुळे धोका निर्माण होतो. मायोकार्डियल इन्फेक्शन, हृदयविकाराचा झटका आणि मृत्यूचा धोका देखील असतो.
मायग्रेन हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक कसा वाढवू शकतो?
एका संशोधनानुसार, ज्या लोकांना दीर्घकाळ मायग्रेनची समस्या आहे, त्यांच्यामध्ये हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक यांसारख्या गंभीर परिस्थितींचा धोका दुप्पट होतो. जर्नल ऑफ न्यूरोलॉजीमध्ये दिलेल्या अहवालानुसार, मायग्रेनवर वेळीच उपचार न केल्यास, घातक इस्केमिक स्ट्रोकचा धोका देखील वाढू शकतो. अशा परिस्थितीत, ज्या लोकांना मायग्रेन ते गंभीर मायग्रेन आहे त्यांनी आपली जीवनशैली (Lifestyle) सुधारली पाहिजे आणि या समस्येचे लवकरात लवकर निदान करणं गरजेचं आहे.

मायग्रेन कसे कमी करावे?
जर तुम्हाला तीव्र डोकेदुखी होत असेल, तर त्या समस्यांबद्दल जाणून घ्या आणि त्यापासून बचाव करण्याचे मार्ग शोधा. यामध्ये ध्यान करणं हा मायग्रेनवर मात करण्याचा चांगला उपाय आहे.

मायग्रेनची समस्या टाळण्यासाठी सकस आहार घ्या आणि जास्त वेळ उपाशी राहू नका. कारण उपाशी राहिल्याने मायग्रेनची समस्या वाढते.

जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन केल्याने देखील मायग्रेनचा धोका वाढतो, त्यामुळे चहा, कॉफी आणि कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा.

जर तुम्ही हे नियम पाळले तर नक्कीच तुम्हाला मायग्रेन सारख्या समस्येवर मात करता येऊ शकते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम