सुंदरपट्टी येथे शाळापूर्व तयारी मेळावा व शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

बातमी शेअर करा...

अमळनेर (आबिद शेख ) अमळनेर सुंदरपटटी आदर्शगांव येथील जि.प. शाळेत जून2022 मध्ये इ. 1 लीत दाखलपात्र विद्यार्थ्यासाठी शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले . सदर प्रसंगी दाखलपात्र विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक व पालक जाग्रुती अभियान अंतर्गत प्रभातफेरी काढण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे लोकनियुक्त सरपंच भाऊसो. श्री. सुरेश अर्जुन पाटील हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मेळावा भेटीसाठी पं.स. अमळनेर येथील विस्तार अधिकारी ( आरोग्य ) मा. श्री. व्ही.एस. बैसाणे साहेब उपस्थित होते.अध्यक्ष व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते मेळाव्याचे फित कापून उदघाटन करण्यात आले. तसेच सेल्फी पॉईंटचे देखील फित कापून उदघाटन केले. मेळाव्या मध्ये दाखलपात्र वि.साठी सात प्रकारचे स्टॉलची मांडणी करण्यात आली. यात प्रत्येक दाखलपात्र वि .कडून विविध कृती करून घेण्यात आल्या. वि. ना. दाखल करण्यात आले मेळाव्यामध्ये मा. व्ही.एस बैसाणे साहेब व कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसो. श्री.सुरेश पाटील यांनी वि. व पालकांना मार्गदर्शन केले. प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. दत्तात्रय पा. व सर्व सदस्य,अंगणवाडी सेविका, मदतनिस, शा.पो. आ. शिजवून देणाऱ्या सौ. सुनंदाताई पाटील सर्व स्वयंसेवक, केंद्रप्रमुख श्री. विश्वास पाटील तसेच ग्रा.प. सदस्य व ग्रामस्थ बंधू, भगिनी तसेच पालक बंधू, भगिनी व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्या. श्री. संजय जगताप सर यांनी केले. सूत्रसंचलन श्री. विश्वास पाटीलसर यांनी केले. तसेच संपूर्ण मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. जयश्री बारड मॅडम व श्रीम. स्मिता सोनवणे मॅडम तसेच मेळाव्यासाठी नियुक्त्त केलेले स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम घेतले . शेवटी आभाराचा कार्यक्रम होवून मेळाव्याची सांगता करण्यात आली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम