सनी लिओनीचं ‘थर्ड पार्टी’ रिलीज
बातमीदार | १७ नोव्हेबर २०२३
मागील बऱ्याच दिवसांपासून अनुराग कश्यपच्या ‘केनेडी’ या चित्रपटामुळे लाइमलाइटमध्ये असलेल्या सनी लिओनीचं ‘थर्ड पार्टी’ हे नवं कोरं गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यात सनीच्या जोडीला आयएएस अभिषेक सिंह आहे. “मेरी पार्टी में कोई थर्ड पार्टी नहीं..’ असा मुखडा असलेलं हे गाणं अभिषेकनंच लिहिलं आहे.
सनी अभिषेकचं हे गाणं तरुणाईला थिरकायला लावणारं आहे. याबाबत सनी म्हणाली की, या गाण्यात मी एका आयएएस अधिकाऱ्यासोबत दिसत असले तरी त्यामुळे फार फरक पडत नाही. अभिषेक एक चांगला कलाकार असल्याने काम करताना त्याच्याकडून काही गोष्टी शिकता आल्याचंही सनी म्हणाली. मुळात आयएएस असलेल्या अभिषेकची “दिल्ली क्राइम’ ही वेब सिरीज खूप गाजली असून, त्याच्या अभिनयाचं कौतुकही झालं आहे. अभिनयासोबतच गायन, गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन करण्याची कलाही त्याच्या अंगी आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम