स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी घोषणा : पाच लोकसभा लढविणार ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ मार्च २०२३ ।  राज्यात नेहमीच शेतकरीच्या समस्येवर लागलीच मैदानात उतरणारा पक्ष म्हणून ओळख मिळविलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज कोल्हापूरच्या राजकारणात मोठी घोषणा केली आहे. गुढी पाडव्याचा मुहूर्त साधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मोठी घोषणा केलीये.

लोकसभा आणि विधानसभेला दोन वर्षे बाकी असतानाच शेट्टींनी घोषणा करुन राजकीय पक्षांचं टेन्शन वाढवलंय. राजू शेट्टींनी मुहूर्त बघून घोषणा केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चाही रंगली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शड्डू ठोकला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगलेसह पाच लोकसभा मतदारसंघातील निवडणुका लढवणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी आज केली. माजी खासदार राजू शेट्टींचा हातकणंगले मतदार संघात पराभव झाला होता.

मात्र, शेट्टी पुन्हा एकदा त्याच मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याचं कळतंय. लोकसभा मतदारसंघातील निवडणुका लढविण्याबाबत लवकरच उमेदवारांची यादीही जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आंबा इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रशिक्षण मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला. राजू शेट्टींनी निवडणूक लढण्याबाबत स्वतः प्रतिक्रिया देत हा निर्णय जाहीर केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम