चक्क करणला थांबविले विमानतळावर ; व्हिडीओ व्हायरल !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ मार्च २०२३ ।  बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये जर काही घडले देखील त्यात करण जोहरशिवाय अपूर्ण असते. प्रसिद्धीच्या झोतात कसे राहायचे हे करणला चांगलेच माहित आहे. मग ते त्याच्या चित्रपटांबद्दल असो किंवा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल गॉसिप असो. हा निर्माता दिग्दर्शक जितका त्याच्या चित्रपटांबद्दल जागरूक आहे तितकाच तो त्याच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखला जातो. करणचा विमानतळावरील एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

करण जोहरचा एक व्हिडिओ समोर आला आहे, पण सध्या तो त्याच्या लूकसाठी नाही तर त्याच्या लहरीपणामुळे चर्चेत आला आहे. त्याची स्टाइल पाहून चाहत्यांनी त्याला चांगलाच सुनावलं आहे. विमानतळावर घाई घाईत निघालेल्या करणचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

करण जोहर विमानतळावर पोहोचताच गेटमधून आत शिरू लागला. यावेळी त्याला सुरक्षारक्षकांनी थांबवून कागदपत्रे दाखवण्यास सांगितले. यानंतर करण जोहरलाही बॅगेतून कागदपत्रे काढायला वेळ लागला. मग काय, नेटिझन्सनी करणला नियमांचे महत्व सांगायला सुरुवात केली. सोशल मीडिया युजर्सनी करण जोहरचा त्याच्या या वागणुकीवर क्लास घेतला आहे. एकाने लिहिले, “याला कोणीतरी नियम समजून सांगा, हा चित्रपटाचा सेट नाही’ तर दुसऱ्या एकाने हॅट्स ऑफ दॅट सेक्युरिटी ऑफिसर’ अशी कमेंट केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम