महिला अबला नही तो सबला है ; मुक्ताईनगरात निघाला भव्य मूक मोर्चा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ९ ऑगस्ट २०२३ | राज्यात, देशात महिलांवर अत्याचाराच्या ,महिलांचे अपहरण करण्याच्या घटना वाढत आहेत. मणिपूर राज्यात हिंसाचार सुरू असून महिलांची नग्न धिंड काढण्यात आली एरंडोल तालुक्यात वसतिगृहात 12 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आला भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सात वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करून मृतदेह चाऱ्यात लपवण्यात आला या अत्यंत अमानवीय आणि क्रुर घटनांच्या निषेधार्थ आणि या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणी मुक्ताईनगर येथे
सर्वपक्षीय मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मोर्चात सार्वपक्षीय नेते,सामाजिक संघटना पदाधिकारी नागरिक यांच्यासोबत महिला,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महिला भगिनींवर अत्याचार करणार्‍यांना फाशीची शिक्षा द्यावी. यासंदर्भातील खटला जलद गती न्यायालयात चालवावा
अत्याचाराच्या वाढत्या घटना बघता गुन्हेगारांवर कायदा व सुव्यवस्थेचा वचक राहिला नाही असे दिसुन येते या गुन्हेगारांना जलद गतीने कठोर शिक्षा व्हावी यासाठी कायदा करून गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा अशा मागण्या मुक्ताईनगर तहसीलदार तथा पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन करण्यात आल्या. प्रवर्तन चौक येथून मुक मोर्चा ला सुरुवात करून तहसिल कार्यालयाजवळ प्रमुख उपस्थितांनी मोर्चाला संबोधित केले . यावेळी विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करून सदर घटनांचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच मुलींना महिलांना आरक्षणा बरोबर संरक्षण मिळावे अशी मागणी केली

यावेळी मनोहर खैरनार यांनी संबोधित करताना सांगितले . महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे शिकलेली आई घरादाराला पुढे नेई, डॉ बाबासाहेब आंबेडकर सांगायचे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी महिला या जन्मदात्री असून सृष्टीचे निर्माण करणाऱ्या आहेत म्हणून रडू नका घाबरू नका तर अत्याचार अन्याया विरोधात लढा महिलांना वाईट नजर कळते आपल्याकडे वाईट नजरेने बघणाऱ्याचा सामना करा त्याचे तोंड ठेचा राज्यात देशात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे सत्ताधाऱ्यांच्या मनमानी पुढे यंत्रणा लाचार झाली आहे महिला सुरक्षा विधेयकाचे काय झाले असा प्रतिप्रश्न त्यांनी केला? प्रत्येक वर्षी महिला सक्षमीकरण सुरक्षेसाठी नवनवीन योजना आणल्या जातात परंतु त्यांची अंमलबजावणी केली जात नाही फक्त कागदावरच निधी खर्च केला जातो महिलांनी कराटे व इतर स्व रक्षणाचे धडे घ्यावे असे मनोहर खैरनार यांनी उपस्थित महिला युवतींना आवाहन केले यावेळी डॉ जगदीश पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले राज्यात देशात महिलांवर अत्याचार वाढले आहेत सरकारने डोळ्यांवर पट्टी बांधली आहे त्यामुळे मणिपूर, भडगाव सारख्या महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत सरकार मध्ये आता ज्या महिला नेत्या सहभागी आहेत त्या केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना महिला अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवायच्या परंतु आज सत्तेत मंत्रीपदावर असताना त्यांच्या तोंडावर पट्टी बांधली आहे
पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारांवर वचक कमी झाल्याचे व दबावात वावरत असल्याचे दिसून येत आहे कु प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने दबाव झुगारावा अन्याय अत्याचार विरोधात जो आवाज उठवतो सत्ताधारी त्याच्यावर दडपण आणतात एका पत्रकाराने भडगाव घटने बाबतीत मुख्यमंत्री विरोधात बोलले तर सत्ताधारी आमदार यांनी त्या पत्रकाराला फोन करून खालच्या पातळीच्या शब्दात शिवीगाळ करून धमकी दिली अत्याचार करणाऱ्यांना ठेचुन काढण्यासाठी कठोर कडक कायदे करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ जगदीश पाटील यांनी सांगितले.

यावेळी संबोधित करताना रोहिणी खडसे म्हणाल्या राज्यात देशात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत मणिपूर येथे हिंसाचार करून दोन महिलांची नग्न धिंड काढून त्या महिलांवर अत्याचार करण्यात आला. घटना घडल्या नंतर एक महिन्याने या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला हा व्हिडीओ बघून प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारला जाग आली तोपर्यंत प्रशासन, न्याय व्यवस्था कुंभकर्णी झोपेत होती परंतु अद्यापही त्या आरोपींवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. एरंडोल येथे वसतिगृहात 12 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला यातील आरोपी हा 56 वर्षाचा आहे आरोपीच्या पत्नीला या घटनेची माहिती होती तरी तिने एक महिला म्हणून पुढे येऊन घटनेला वाचा फोडली नाही. आपल्या एखाद्या माता भगिनी वर अत्याचार होत असेल तर प्रत्येकाने या विरोधात आवाज उठवायला हवा जरी आरोपी नातेवाई शेजारी असला तरी निदान घटनेची माहिती पोलिसांना द्यायला हवी अशा वेळी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्या बाबत सुप्रिम कोर्टाचे निर्देश आहेत.

गोंडगाव येथे घडलेली घटना अत्यंत अमानवीय निर्दयी आहे एका बालिकेवर अत्याचार करून तिचे प्रेत चाऱ्यात लपवण्यात आले एवढी क्रूरता कुठून आली माणूस रानटी अवस्थेतून संगणक युगात आला माणसाने आज वैचारिक सुसंस्कृतपणाचा टप्पा गाठल्याच्या गप्पा मारल्या जातात परंतु माणसाचा मूळ रानटी स्वभाव कायम असून स्वभावातील रानटी पणा विकृत होत असल्याचे या घटना मधून जाणवते
या विकृत आणि मुजोर मानसिकतेला भयभीत करून अशा कृत्यांपासून परावृत्त करण्यासाठी काठोराती ल कठोर शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली पाहिजे. आणि त्याची कडकं अमलबजावणी केली तरच काही सुधारणा होईल.

एखादी मुलगी घराबाहेर जात असते तेव्हा तिचे आईवडील आजूबाजूचे लोक तिला पूर्ण अंगभर कपडे घाल, कोणाकडे बघून हसू नको बोलू नको असा सल्ला देतात पण त्याअगोदर आपल्या मुलांना माता भगिनींचा सन्मान करण्याबद्दल शिकवावे छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम प्रत्येक स्त्रीला माता भगिनींचा दर्जा दिला स्त्रियांचा सन्मान केला हे संस्कार राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना दिले हेच संस्कार आज प्रत्येक आईने आपल्या मुलांना द्यायची गरज आहे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या स्त्रिया माता भगिनी आहेत हे शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे

स्त्रियांवरील अत्याचार समाजात ज्या पद्धतीनेन पहिले जातात, त्यावर सामाजिक भूमिका बदलायला हवी. अत्याचाराच्या विरोधात स्त्रियांची भूमिका कणखर होणे आवश्यक आहेच; पण शिवाय याविरुद्ध काय पाऊल उचलता येईल, कायदा काय म्हणतो आणि मदत कुठे मागता येईल, याविषयी समाजजागृती करणे आवश्यक आहे. अत्याचाराने त्रस्त झालेल्या महिलांचे मानसिक खच्चीकरण झालेले असते. अशावेळी तिला मानसिक आणि भावनिक आधार देणे आवश्यक आहे. शिवाय तिचे योग्यप्रकारे सामाजिक पुनर्वसन करणेही गरजेचे आहे.असे रोहिणी खडसे यांनी सांगितले. तसेच आपल्या येथील महिला या राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, झाशीची राणी यांचा वारसा चालवणाऱ्या वारसदार आहोत म्हणून महिलांनी अबला नाही तर सबला बनावे असे आवाहन त्यांनी केले आज रोजी प्रत्येक स्त्री ने स्वरक्षणाचे धडे घेऊन स्वयंसिद्धा बनून स्वतःचे रक्षण करण्याची वेळ आली आहे त्यासाठी माता भगिनींना स्व रक्षणाचे धडे देण्यासाठी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात 14 ऑगस्ट पासून स्वयंसिद्धा अभियान राबविणार असल्याचे रोहिणी खडसे यांनी जाहीर केले

यावेळी आ एकनाथराव खडसे मोर्चाला संबोधित करताना म्हणाले राज्यात देशात घडणाऱ्या घटनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत पुर्वी नारी चुल आणि मुल पर्यंत मर्यादित होती परंतु महिला आता सक्षम झाल्या आहेत प्रत्येक क्षेत्रात त्या भरारी घेत आहेत प्रत्येक नोकरी, व्यवसायासाठी बाहेर पडत आहेत परंतु काही ठिकाणी महिलांना असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होते या असुरक्षिततेतून मणिपूर, गोंडगाव सारख्या घटना घडत आहेत
देश प्रगती करत असला तरी महिला अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्या आहेत या घटना मन विषण्ण करणाऱ्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत संविधानावर चालणाऱ्या लोकशाही प्रधान देशात अशा घटना घडत आहेत या देशाची मान शरमेने खाली झुकवणाऱ्या आहेत गोंडगाव ,एरंडोल ची घटना मी विधानपरिषदेत आवाज उठवला तेव्हा सर्व आमदारांना धक्का बसला सर्वांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. अशा घटना घडल्या नंतर कधी सरकारकडे बोट दाखवले जाते कधी संस्कार कमी पडतात म्हणून समाजाकडे बोट दाखवले जाते परंतु आता महिलांनी सुद्धा स्व रक्षण करण्यासाठी स्व रक्षणाचे धडे घेऊन स्वयंसिद्धा होण्याची वेळ आली आहे आपल्या जवळील पर्स बॅग मध्ये मिरची पुड सारख्या स्व रक्षण होईल अशा वस्तू बाळगाव्या महिला अत्याचाराच्या घटना1जलद गती न्यायालयात चालवाव्या त्यासाठी सरकारने अनुभवी वकील नेमावा व पिडीत कुटुंबाला सरंक्षण तसेच आर्थिक सहाय्य द्यावे अशी मागणी केली

महिला अत्याचाराच्या घटना घडणार नाही यासाठी सर्वांनी जागरूक रहावे अत्याचार करणाऱ्याना सामाजिक बहिष्कृत करावे म्हणजे भविष्यात असे कृत्य करण्यासाठी कोणी धजावणार नाही काही घटना मध्ये खटला चालतो आरोपीना शिक्षा होते परंतु शिक्षेची अंमलबजावणी होत नाही म्हणून अशा घटनांकडे गांभीर्याने बघून आरोपीना तात्काळ शिक्षा कशी होईल शिक्षेची अंमलबजावणी कशी होईल यासाठी कठोर कायदे करण्याची वेळ आली आहे असे एकनाथराव खडसे म्हणाले . यावेळी मोर्चात सर्व पक्षीय नेते ,सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नागरिक महिला, विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम