बस चालकाचे ओव्हरटेक केला अन बस गेली ३० फुट खोल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ९ ऑगस्ट २०२३ | राज्यातील महामार्गावर दुचाकीसह चारचाकी व बसचा अपघात नियमित होत असल्याचे चित्र असतांना दि.८ रोजी रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा बसचालकाने ओव्हरटेक करीत असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट बस ३० फुट खोल गेली असून या प्रवासी जखमी झाले आहे. हि घटना जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या केंदळी फाट्याजवळ घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंदळी फाट्याजवळ पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी समोर असलेल्या आयशरला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला. पुसदवरून मुंबईकडे जाणारी एसटी बस रस्त्याच्या बाजूला 30 फूट खाली कोसळली. या अपघातात 22 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. तर तीन प्रवाशांना अधिक उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसटी बसमध्ये एकूण 42 प्रवासी होते. एसटी चालकाचे नियंत्रण सुटून ही बस रस्त्या लगत 30 फूट खाली कोसळली असल्याचे म्हटले जात आहे. यावेळी स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढून मंठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलं. मागील काही महिन्यांपासून एसटीच्या अपघातात वाढ होत असल्याचे चित्र आहे. खराब रस्ते आणि गाड्या खराब यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे म्हटले जात आहे. खराब रस्ते आणि गाड्या खराब यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे म्हटले जात आहे. स्थानिक आणि पोलिसांनी जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम