
दै. बातमीदार । २१ एप्रिल २०२३ । येत्या दोन दिवसावर अक्षय्य तृतीयेचा सण येवून ठेपला आहे. या दिवशी बहुतांश लोक सोने खरेदी करतात. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. अक्षय्य तृतीयेला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो.
या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करून त्यांची आराधना केली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र ज्योतिष शास्त्रात असे सांगितल्या गेलेय की जर तुम्ही सोने खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या राशीनुसार इतर धातूही खरेदी करू शकता. चला जाणून घेऊया अक्षय्य तृतीयेला कोणत्या राशीचे लोक कोणते धातू खरेदी करू शकतात.
मिथुन आणि कन्या राशी – या राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेला ब्राँझचे दागिने खरेदी करावेत. यामध्ये ताट, लोटा अशी भांडी असू शकतात. हे धातू खरेदी केल्याने तुमच्या व्यवसायात वाढ होईल.
मकर राशी – या राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याऐवजी स्टीलची भांडी किंवा लोखंडाची वस्तू खरेदी करावी. याने तुम्हाला भगवंताचा आशीर्वादही मिळेल आणि तुमचा मानसिक त्रासही कमी होईल.
वृषभ आणि कर्क : या दोन राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ राहील. असे केल्याने त्यांना कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता वाढेल.
धनु आणि मीन : या राशीचे लोक अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने आणि पितळेच्या वस्तू खरेदी करू शकतात. सोनं आणि पितळ खरेदी केल्याने तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.
वृश्चिक : या राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेला सोन्याऐवजी तांब्यापासून बनवलेली कोणतीही वस्तू खरेदी करणे चांगले राहील. असे केल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
मेष आणि सिंह : अक्षय तृतीया 2023 रोजी या दोन राशीच्या लोकांनी सोने आणि तांबे खरेदी करावेत. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल, ज्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतील.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम