उन्हाळ्यात हे पेय घेतल्यास आरोग्य राहणार फायदेशीर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ एप्रिल २०२३ ।  प्रत्येक व्यक्ती उन्हाळा सुरू झाल्यावर आपल्या आहारात आपल्या हेल्थी फूड्ससह हेल्थी ड्रिंक्सचाही समावेश करत असतो. तेव्हा आपण आपल्याला वेळ मिळेल त्याप्रमाणे कैरीचे पन्हे, कोकम सरबत, आवळा सरबत, नारळाचे पाणी, ताक किंवा उन्हाळ्याचे उपयुक्त ठरतात ते सर्व पदार्थ खाण्याचा-पिण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आपल्यालाही आपल्या आरोग्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो.

परंतु ऋतू कोणताही असो आपल्याला आपल्या आहारात आपल्या शरीरातील साखर कमी करण्यासाठीही तितकेच प्रयत्न हे करावे लागतात. तेव्हा उन्हाळ्यात जर का तुम्हाला तुमच्या शरीरातील साखर ही चांगली ठेवायची असेल तर तुम्ही या काही पेयांचा वापर करू घेऊ शकता.

या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की जर का तुम्हाला शुगरचा त्रास असेल तर तुम्ही या पेयांचा आपल्या आहारात समावेश करून घेऊ शकता. उन्हाळ्यात आपल्याला जास्त तहान लागते परंतु तहान लागत असली तरी आपल्याला आपली तहानच फक्त भागवून फायद्याचे नाही तर आपल्याला आपल्या आरोग्याच्या दृष्टीनंही तशी पेय पिणं आवश्यक आहे. ज्यातून आपल्या शरीरालाही चांगला फायदा होईल. आम्ही येथे फक्त ओआरएस किंवा ग्लुकोन-डी बद्दल बोलत नसून तुम्ही या पेयांचा आपल्या आहारात समावेश करून पाहा.

नारळाचे पाणी – नारळाचे पाणी हेही शुगर असणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. यातून तुम्हाला फायबर आणि पॉटेशियम हे गुणधर्म मिळतात. सोबतच तुमची साखरही कमी व्हायला मदत होते.

लिंबू पाणी – याचे सेवन केल्यानं तुमची साखर ही आटोक्यात राहते. यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते.

पालक ज्यूस – यामुळे साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. सोबतच यात प्रोटीन, आयरन, आणि व्हिटॅमिन सी असते.

कारल्याचे जूस – हे ज्यूस डायबेटिस पेशंटला फायेदशीर असते. यातमध्ये सेपॉनिन्स आणि टरपेनॉइड्स असतात.

धन्याच्या पावडरचे ज्यूस – या ज्यूसचे सेवन केल्यानंतरही तुम्हाला साखर कमी होण्यास फायदा होऊ शकतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम