
ठाकरे परिवारातील या सदस्यही येणार राजकीय आखाड्यात !
दै. बातमीदार । १३ एप्रिल २०२३ । एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार शिवसेनेला सोडून गेल्यानंतर ठाकरे परिवार एकाकी पडले आहे. त्यावर आता ठाकरे परिवारातील संपूर्ण सदस्य पुन्हा एकदा शिवसेनेची संघटनेला ताकद पुन्हा निर्माण करून देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यानंतर आदित्य व आता रश्मा ठाकरे राजकीय आखाड्यात उतरणार आहेत.
नाशिक शहरात शिवसेनेने अद्ययावत कार्यालयाच्या उभारणीसह ठाकरे गटातील अनेक महिला पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्याची मोहीस सुरु ठेवल्यानंतर आता ठाकरे गटाकडूनही महिला आघाडीला बळ देण्यासाठी हालचाली होऊ लागल्या आहेत. त्यानुसार शहरात रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत एप्रिल अखेरीस महिला मेळावा होणार आहे.
शहरासह जिल्ह्यात विस्तारासाठी शिवसेना जोरकसपणे कामाला लागली आहे. विशेषत्वाने ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु असतात. अलीकडेच ठाकरे गटाच्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या पार्श्वभूमिवर ठाकरे गटाची महिला आघाडी पुन्हा बळकट करण्यासाठी पदाधिकारी कामाला लागले आहेत. नाशिकरोड येथे शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीची बैठक काही दिवसांपूर्वी झाली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांनी लवकरच शहर कार्यकारिणीसह इतर पदाधिकारी निवडले जाणार असून त्यात जास्तीत जास्त महिलांना काम करण्याची संधी मिळेल, असे सांगितले होते. तसेच नाशिकमध्ये रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत महिला मेळावा होणार असल्याने त्यासाठी सर्व महिलांनी तयारीला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. यावेळी जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनीही मार्गदर्शन केले होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम