तलाठी भरती : अर्जात चूक दुरुस्तीची सुविधा नाहीच !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ जुलै २०२३ ।  राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारने गेल्या काही दिवसापूर्वी महसूल व वनविभागाकडून तलाठी भरती प्रक्रिया ही ऑनलाइन असून त्यासंबंधातील अर्ज भरताना होणाऱ्या चुकीला सुधारण्याची वा दुरुस्त करण्याची सोय यात नसल्याने ही अर्ज प्रक्रिया उमेदवारांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे.

केवळ इतकेच नव्हे तर, यासंबंधात उपलब्ध असलेल्या हेल्पलाइन क्रमांकावरही उमेदवारांना कोणतीही मदत मिळत नसल्याच्या तक्रारी उमेदवार करीत आहेत. तलाठी भरती प्रक्रिया टीसीएस कंपनीकडून राबविण्यात येत असून अर्ज भरताना होणाऱ्या चुकीच्या दुरुस्तीची कोणतीही सुविधा उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. या त्रासाची महसूल विभागाकडून तत्काळ दखल घेतली जावी अन्यथा अनेक उमेदवार तलाठी भरतीच्या प्रक्रियेतूनच बाद होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक वर्षांपासून तलाठी भरतीची प्रतीक्षा होती. अखेर राज्यांतील ४ हजार ६४४ जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली.

अनेक वर्षांपासून परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी त्यामुळे सुखावले. येत्या १७ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मुदत देण्यात आली आहे. परंतु, अर्ज भरण्यामध्ये असणारी ही त्रुटी उमेदवारांना अस्वस्थ करणारी ठरली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाप्रमाणे राज्य शासनाने भरतीसाठी नियुक्त केलेल्या या कंपनीच्या माध्यमातून उमेदवारांना भरलेल्या अर्जात संभाव्य चूक दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम