माजी यशस्वी विद्यार्थी शाळेतील इतरांसाठी प्रेरणादायी – डॉ. डोंगरे

रोटरी मिडटाऊन तर्फे शिक्षकांचा सन्मान

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ सप्टेंबर २०२२ । जळगाव येथील माजी यशस्वी विद्यार्थी शाळेत येऊन शिक्षकांचा सन्मान करुन कृतज्ञता व्यक्त करतात ही त्यांची कृती व त्यांनी केलेली प्रगती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे असे क.ब.चौ.उ.म.विद्यापीठाचे वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल डोंगरे यांनी प्रतिपादन केले.

रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे जि.प.विद्या निकेतनमध्ये आयोजित शिक्षक सन्मान सोहळ्यात ते बाेलत होते. अध्यक्ष मनोज पाटील, माजी प्राचार्य पी.बी.चौधरी, डॉ. अपर्णा मकासरे, किशोर सुर्यवंशी, डॉ. ऊषा शर्मा, श्रीरंग पाटील, सुनंदा देशमुख, मृणालिनी चित्ते आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
शाळेतील एस.एस.गरुड, जी.आर.मराठे, आय.एस.वाघ, एस.बी.पाटील, एम.आर.चौधरी, पी.बी.पाटील, के.सी.पाटील, एस.आर.शिरसाठ, वंदना जाधव, टी.पी.कुंभार आदि शिक्षकांना नेशन बिल्डर ॲवार्ड प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष मनोज पाटील हे जि.प.विद्या निकेतन शाळेचे माजी विद्यार्थी असून त्यांनी व्यावसायिक क्षेत्रात मोठी प्रगती करुन रोटरीचे अध्यक्षपद भूषवित असतांना शाळेतील शिक्षकांचा केलेला गौरव हा भावनिक सोहळाच आहे अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन के.सी.पाटील यांनी तर आभार पी.बी.पाटील यांनी मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम