केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉ. भारतीताई पवार यांची उपस्थिती

आरोग्य विद्यापीठात स्वातंत्र्य संग्रामात जनजाति नायकांचे योगदान विषयावर शुक्रवारी मार्गदर्शन कार्यक्रम

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ सप्टेंबर २०२२ । महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात स्वातंत्र्य संग्रामात जनजाति नायकांचे योगदान विषयावर शुक्रवार, दि. १६ सप्टेंबर २०२२ रोजी माहिती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेे. आरोग्य विद्यान विद्यापीठ आणि राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आरोग्य व कुटुुंब कल्याण मंत्रालयाच्या मा. केंद्रीय राज्यमंत्री नामदार श्रीमती डॉ. भारतीताई पवार, अध्यक्षा विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प., प्रमुख अतिथी म्हणून पश्चिम महाराष्ट्रचे जनजाति कल्याण आश्रमचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर व सन्माननीय अतिथी राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोगाचे श्री. मिलिंद थत्ते, मा.प्रति-कुलगुरु डॉ.मिलिंद निकुंभ आदी उपस्थित राहणार आहेत.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, भारतीय आध्यात्मिक परंपरा, विशिष्ट उच्च जीवन मूल्ये हा संस्कृतीचा भाग आहे. स्वातंत्र्य संग्रामात आदिवासी समाजाने आपल्या शौर्याने व बलिदानाने राष्ट्ररक्षणात महत्त्वाचे योगदान दिले आहे. आदिवासी समाजाने इंग्रजांची गुलामगिरी कधीच स्वीकारली नाही आणि वेळोवेळी सशस्त्र बंड आणि संघर्षही झाले. भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली पहारिया चळवळ, कोया जमातीचे बंड, कोल जमातीचा सशस्त्र संघर्ष झाले तसेच सिद्धू-कान्हू यांच्या नेतृत्वाखालील संथाल चळवळ, विविध भिल्लांच्या चळवळी, मानगडचे बलिदान, राणी गैडिनलियूच्या नेतृत्वाखालील नागा चळवळ, आदिवासी समाजाचा ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष आणि बलिदान त्यांनी केले आहे. स्वातंत्र्य चळवळीत लोकनायकांच्या योगदानाची अशी हजारो नावे आहेत आजही अशी अनेक लोकगीते व कथा आदिवासी समाजात प्रचलित आहेत ज्या समाजाचा इंग्रजांशी झालेला संघर्ष अधोरेखित करतात असे त्यांनी सांगितले. देशभरात अनेक ठिकाणी अशा कार्यक्रमांचे आयोजन विविध विद्यापीठांमार्फत करण्यात आले असून त्यास अखील भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे सहकार्य लाभले आहे.

कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. सुनिल फुगारे यांनी सांगितले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य संग्रामात जनजाति नायकांचे योगदानाची माहिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थी, शिक्षक व अभ्यागतांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात दृकश्राव्य माध्यमाव्दारे जनजाति क्रांतिकारी फिल्म दाखविण्यात येणार असून पश्चिम महाराष्ट्रचे जनजाती कल्याण आश्रमचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर स्वातंत्र्य संग्रामात जनजाति नायकांच्या योगदानाची माहिती देणार आहेत. राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोगाचे श्री. मिलिंद थत्ते सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात मा. केंद्रीय राज्यमंत्री नामदार श्रीमती डॉ. भारतीताई पवार व कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोगातर्फे एक विशेष प्रदर्शनाचे आयोजन कार्यक्रमस्थळी करण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोगाचे संयोजक श्री. अशोक भुसारे यांनी दिली.

सदर कार्यक्रमाचे विद्यापीठात शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत सकाळी ११:०० वाजता आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास विद्यार्थी व शिक्षकांनी मोठया संख्येने हजर रहावे असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम