टीम इंडियाचे टेन्शन वाढले : पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर

बातमी शेअर करा...

बातमीदार | ४ नोव्हेबर २०२३

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 2023 स्पर्धेत टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे वर्ल्डकप स्पर्धेच्या बाहेर झाला आहे. आयसीसीने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापतग्रस्त झाला होता. गोलंदाजी करताना हार्दिकचा पायाला दुखापत झाली होती.

हार्दिक दुखापतीमधून बरा व्हावा म्हणून संघ व्यवस्थापनाने त्याला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवले होते. तेथे हार्दिकच्या फिटनेसची चाचणी सुरू होती. हार्दिक पांड्या लवकरात लवकर बरा व्हावा, अशी प्रार्थना भारतीय क्रिडाप्रेमी करीत होते. मात्र, चाहत्यांची ही प्रार्थना कामाला आली नाही. अखेर हार्दिक पांड्याला दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर जावे लागले. ICC ने याबाबतची पुष्टी केली आहे.

हार्दिक पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा समावेश करण्यात आला आहे. प्रसिद्ध कृष्णा हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रॅक्टिस करीत होता. शनिवारी स्पर्धेच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीकडून मान्यता मिळाल्यानंतर त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम