दात पिवळे पडले;हे उपाय करा होतील पांढरे शुभ्र !
दै. बातमीदार । २६ ऑक्टोबर २०२२ । देशातील जास्तीत जास्त लोकांचे दात हे पिवळे पडत असतात, हि सर्व खूप सामान्य समस्या आहे. खाणे पिणे यामुळे दात पिवळे पडतात पण योग्य ब्रश न केल्याने दातेचा पिवळेपणा वाढत जातो. सध्या दिवाळीच्या दिवसांमध्ये गोडधोड आणि एकापेक्षा एक भारी पदार्थ आपण मनसोक्तपणे खातो. पण यामुळे कित्येक जणांचे दात पिवळे पडतात. तुम्ही जर हे उपाय एकदा करून पाहिले तर घरीच पांढरे शुभ्र दात करू शकतात.
लवंग बारीक करा. त्यात ऑलिव्ह तेल घाला आणि दातांवरील डाग असलेल्या भागांवर हे मिश्रण लावा. तुमच्या दाताचा पिवळसरपणा दूर होईल.
दातांचा पिवळसरपणा दूर करण्यासाठी टोमॅटो आणि स्ट्रॉबेरीचा वापर करू शकता. प्रत्येकाचा गर तयार करुन दातांवर लावा. पाच मिनिटानंतर तोंड धुवून घ्या. तुम्हाला फरक दिसून येईल.
खोबरेल तेलाने गुळण्या केल्यानेही दाताचा पिवळसरपणा दूर होतो. याशिवाय दात पांढरेशुभ्र दिसायला लागतात. दातांमधील दुर्गंधी दूर होते.
लिंबूची साल आठवड्यातून दोन तीनदा दातांवर घासली तर दातांचा पिवळसरपणा दूर होतो.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम