भडगावातील 55 ब्रास अवैध वाळूंच्या थप्यावर तहसीलदार ची धाड व जप्ती ची कार्यवाई

बातमी शेअर करा...

भडगाव – प्रतिनिधी

      भडगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्याला वरदान ठरलेली गिरणा नदी ही आपल्या अमृत धारांनी जळगाव जिल्ह्यासह भडगाव तालुक्याची तहान भागवते. तसेच गिरणा पट्ट्यातील जमिनींना सुपीकता आणते. परंतु भडगाव शहरातील नगरपालिका पंपिंग हाऊस जवळ वॉटर सप्लाय विहिरी जवळून जे.सी. बि. च्या सहाय्याने अवैध रित्या वाळू कोरून ती वाळू भडगाव पेठ भागातील राजाराम बापू मेगा सिटी, पारोळा रस्त्यावरील जुना अंचाळगाव फाटा, पारोळा रस्त्यावरील नाला जवळ, जुना अंचळगाव रस्त्यावरील नगरपालिका डंपिंग ग्राउंड जवळ, अश्या विविध ठिकाणी भले मोठे अवैध वाळू चे थप्पे टाकून या थप्प्या वरून दररोज 20 ते 25 ढपर वाळू जे. सी. बी. द्वारा भरून धुळे, पारोळा, एरोंडोल, तामसवाडी, येथे चड्या भावाने टाकली जाते.  तहसीलदार मुकेश हिवाळे, टोनगाव तलाठी राहुल पवार, भडगाव तलाठी अविनाश जंजाळे व पथकानि आठवड्ाभरात 55 ब्रास अवैध वाळू चा साठा जमा करून शासन जमा केला आहे.

      तरी या अवैध वाळू बाबत तहसिलदार मुकेश हिवाळे यांनी रात्री सर्रास चालणाऱ्या ढपर वर सरळ हाताने कारवाई त्यांच्यावर गुन्हा दाखल करून वाळू माफिया विरूद्ध एम. पी. डी. ए दाखल करावा व ढपर जे सी. बी. आर. टी. ओ कडे वर्ग करावी तसेच मा. जिल्हाधिकारी जळगाव यांनी भडगाव तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक व रात्री होणारी सर्रास वाहतूक याकडे त्वरित लक्ष द्यावे. अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम