काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भीषण अपघात!

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ११ एप्रिल २०२४ | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. प्रचार करून माघारी असताना ट्रकने मागून धडक दिली. या अपघातामध्ये नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ सदर घटना घडली आहे. मंगळवारी दि. ९ एप्रिल २०२४ रात्रीच्या दरम्यान प्रचार आटपून सुकळी या गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोलेंच्या गाडीला धडक दिली. सदर अपघातामध्ये गाडीचे चांगलेच नुकसान झाले आहे.

सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार दौरा आटपून उशिरा परतत असताना भिलेवाडा गावाजवळ त्यांच्या ताफ्याला भरधाव आणि अनियंत्रित झालेल्या ट्रकने धडक दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ज्या गाडीत बसले होते, त्या गाडीच्या मागच्या भागाचा कचरा झाला आहे. भरधाव ट्रक ताफ्यात घुसून सदर अपघात झाला आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम