भयावह : प्रियकराने प्रेयसीसह घेतले जाळून ; एकतर्फी प्रेमातून झाली घटना !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ नोव्हेबर २०२२ श्रद्धा प्रकरण ताजे असतानाचा राज्यातही पुन्हा एकदा मुलीला पेटवून देण्याची धक्कादायक घटना घडली आहे. औरंगाबाद येथील शासकीय विज्ञान संस्थेत संशोधन करणाऱ्या एका विद्यार्थिनीवर पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.

प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. त्याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडालीय. गजानन मुंडे असे या तरुणाचे नाव असल्याचे समजते. मात्र, तो कोणत्या गावचा रहिवासी आहे, हे अजून कळालेले नाही.

महाविद्यालयात आज दुपारी जेवणाची सुट्टी झाली. त्यावेळी मुलगी प्राध्यापक कक्षात एकटीच असल्याची संधी साधून गजानन आत घुसला. आत येताच त्याने आतून कडी लावून घेतली. काही कळण्याच्या आतच त्याने स्वतःच्या व मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेत मुलीला मिठी मारली. या घटनेत दोघेही भाजले. त्यांना घाटी रुग्णालयात हलविण्यात आले असून, मुलगा साधारण 70 तर मुलगी 30 टक्के भाजल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

विद्यार्थिनी आणि गजानन गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. मात्र, मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद झाले होते. त्याबाबत मुलीने पोलिस ठाण्यात दोन – तीन वेळा लेखी तक्रारही दिली होती. मात्र, साधारण अदखलपात्र नोंद करत पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नसल्याची खंत या मुलीच्या मैत्रिणींनी व्यक्त केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीचा जबाब नोंदवणे सुरू असून, तिला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन्ही विद्यार्थी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधन करत असल्याचे समजते. संबंधित मुलगी ही बायोफिजिक्स अभ्यासक्रमाची विज्ञान संस्थेतील माजी विद्यार्थिनी आहे.

विद्यार्थिनीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे विद्यापीठ आणि शासकीय विज्ञान संस्थेत खळबळ उडाली आहे. उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये ही भीतीचे वातावरण आहे. संबंधित विद्यार्थ्यांनीवर प्रेमप्रकरणातून हल्ला केला की तर इतर काही कारण आहे, याबाबतचा तपास पोलिस करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम