ठाकरे फोटोसेशनसाठी इरशाळवाडीत ; भाजप आमदारांचा घणाघात !
दै. बातमीदार । २३ जुलै २०२३ । राज्यात पावसाने हाहाकार माजविल्यानंतर रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडीत अनेक लोकांचे घरे दरड खाली दाबली गेल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. या ठिकाणी पाहणीसाठी नुकतेच शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इरशाळवाडीत पोहचले होते. त्यानंतर आता भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.
रायगडच्या इरशाळवाडीत बुधवारी रात्री डोंगरकडा कोसळला. त्यात 24 जण ठार झाले. अद्याप 100 हून अधिक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी इरशाळवाडीला भेट देत पीडितांचे सांत्वन केले. तसेच अवघे राज्य तुमच्या पाठिशी असल्याची ग्वाही दिली. भाजप आमदार नीतेश राणे यांनी ठाकरे यांच्या या दौऱ्यावर टीका केली आहे.
नीतेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी असताना काय मदत केली याचे उत्तर द्यावे. ते केवळ फोटोसेशन करण्यासाठी दुर्घटनाग्रस्त भागात जात असतील, तर त्याचा काही फायदा नाही. चित्रपट संपायला आला आणि हे आता पोहोचलेत, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यावरही टीका केली. विनायक राऊत कोकण निर्मित संकट आहे. त्यामुळे मतदारांनी 2024 च्या निवडणुकीत हे संकट दूर करावे, असे ते म्हणाले. नीतेश राणे यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मुखपत्राने मणिपूर हिंसाचारावर केलेल्या टीकेचाही समाचार घेतला. या वृत्तपत्राने आज मणिपूर फाइल्स नामक अग्रलेखाद्वारे केंद्र व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाच्या मुखपत्राचा आजचा अग्रलेख विनाशकाले विपरीत बुद्धीसारखा आहे. मणिपूर घटनेतील राक्षसांना कठोर शिक्षा होईल. या प्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. मणिपूरच्या घटनेवर बोलणारे राजस्थानमधील घटनेवर बोलतील का? ते केवळ पंतप्रधान मोदींना विरोध करण्यासाठी बोलत आहेत. देशाचा विकास व संरक्षण कोण करू शकते, हे देशातील महिलांना ठावूक आहे. काँग्रेसच्या महिला आमदारांनी देशातील इतर घटनांवरही बोलावे. केवळ भाजप द्वेषावर बोलू नये, असे राणे म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम