बागेश्वर बाबांविराधात ठाकरे गटाने केली तक्रार दाखल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ एप्रिल २०२३ ।  देशभर आपल्या चमत्कारासह वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनी शिर्डी येथील साईबाबांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या विधानामुळे खळबळ उडाली होती. दरम्यान बागेश्वर बाबांविराध तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे.

ठाकरे गटाचे नेते राहुल कनाल यांनी ही तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी बागेश्वर उर्फ धिरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम महारांजांबाबत देखील वक्तव्य केले होते. साईबाबा संदर्भात बोलण्याची यांची लायकी नाही, असे राहुल कनाल म्हणाले.

काय म्हणाले होते धीरेंद्र शास्त्री?
साईबाबा हे देव नाहीत. साईबाबा संत आणि फकीर असू शकतात, परंतु देव होऊ शकत नाहीत. आमच्या धर्मात शंकराचार्यांना सर्वात मोठे स्थान आहे, त्यांनी साईबाबांना देवतांचे स्थान दिलेले नाही. कोल्ह्याची कातडी घालून सिंह बनू शकत नाही, असे धिरेंद्र शास्त्री म्हणाले होते. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील बागेश्वर बाबांचा निषेध केला होता. ज्या संतांनी समाज उभारणीचे केले आहे, त्यांच्यावर बोलणाऱ्या तथाकथित महाराजांचा वाचाळपणा बंद झाला पाहिजे. त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही चार भिंतीत धर्माचा काय प्रचार करायचा आहे तो करावा. पण दुसऱ्यांचा अवमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असे विखे पाटील म्हणाले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम