ठाकरे गट अडचणीत ; ईडीने मागितले कोविड घोटाळ्याची कागदपत्रं !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ११ ऑगस्ट २०२३ | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना देशावर मोठे संकट कोसळे होते, त्याचा फटका राज्याला देखील मोठा बसला होता. यावेळी मुंबई महानगरपालीकेच्या महापौरपदी ठाकरे गटाच्या महिला नेत्या होत्या. आता त्यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनंतर आता ईडीने देखील लक्ष घातले आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर या ईडीच्या रडारावर आल्या आहेत. पेडणेकर यांच्यावर सुरू असलेल्या गुन्ह्यांची कागदपत्रे ईडीने मागवल्याचे माहिती समोर आली आहे. ईडीने काल मुंबई पोलिसांकडून यासंबंधीचे कागदपत्रे मागवली आहेत. काही दिवसांपूर्वी बॉडी बॅगचा घोटाळा झाल्यासंदर्भात मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. याच धर्तीवर ईडी किशोरी पेडणीकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कोरोना काळात बॉडी बॅग विकत घेताना जास्त दराने खरेदी झाल्याचा आरोप केला जात आहे. त्यानंतर आता ईडीने या प्रकरणातील एफआयआर आणि इतर कागदपत्रे मागवल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम