ठाकरेंचा देखील थयथयाट मात्र शिंदेंच मुख्यमंत्री !
बातमीदार | २४ सप्टेंबर २०२३ | केंद्रीय मंत्री रामदास आठवले राज्यातील अनेक जिल्ह्यात दौरे करीत असतांना बीड येथे असतांना त्यांनी एक मोठे विधान केले आहे.
मंत्री आठवले म्हणाले कि, आत्तापर्यंत जे म्हणत होते खोक्यात आहेत; तेच आता म्हणतायेत की मुख्यमंत्री पद धोक्यात आहे. मात्र असं काही होणार नाही. जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत कुणीही मुख्यमंत्री होणार नाही. एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री राहणार असून शिंदेंच्याचं नेतृत्वाखालीचं २०१४ ची निवडणूक आम्ही लढवू; असे देखील ते म्हणाले.
मंत्री आठवले म्हणाले, की उद्धव ठाकरेंचा देखील थयथयाट झाला. मात्र एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीस यांनी फोडलं नाही. ते उद्धव ठाकरेंवर नाराज होते. कारण त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. मात्र मागच्या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यामुळे ते नाराज होते. ही खंत त्यांच्या मनात होती त्यामुळे त्यांनी संधी साधून नाराज आमदार सोबत आणले आणि त्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली; असं देखील यावेळी रामदास आठवले म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम