ठाकरेंचे आरोप हास्यास्पद ; अजित पवारांची जोरदार टीका

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ डिसेंबर २०२२ ।  मुस्लिम मते दूर जातील, या भीतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कधीही जाहीर भाषणांत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही. केवळ शाहु-फुले-आंबेडकरांचेच नाव घेतात, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता त्याला प्रतिउत्तर आज अजित पवार यांनी दिले आहे.
राष्ट्रवादी नेते अजित पवार म्हणाले कि, राज ठाकरेंनी शरद पवारांवर केलेले आरोप हे धादांत खोटे आहेत. शरद पवारांना सारा महाराष्ट्र ओळखतो. त्यांनी कायम शाहू, फुले यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचे काम केले आहे,

अजित पवार पुढे म्हणाले की, बातम्या होतात म्हणून राज ठाकरे हे शरद पवारांवर टीका करतात. हेच राज ठाकरेंनी पवारांची मुलाखत घेतली होती. तेव्हा ते काय बोलत होते. असे दुटप्पी वागणे बरे नाही. शरद पवारांना संपुर्ण महाराष्ट्र 55 वर्षांपासून ओळखतो. राज ठाकरेंनी अशा प्रकारचे आरोप करणे हे हास्यपद आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या विधानामुळे महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळण्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर आज माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कुणाच्या मनात काय यावं हा त्यांचा अधिकार आहे. उद्धव ठाकरेंच्या मनात तसे आले असेल म्हणून ते तसे बोलले असतील. उद्या कुणालाही मुख्यमंत्री करायचे म्हटले. पुरुषाला करा किंवा महिलेला करा नाहीतर कुणालाही करा. 145 हा बहुमताचा आकडा आहे. ज्यांच्याकडे हा आकडा असेल त्यांचा मुख्यमंत्री होईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम