ठाकरेंचे परळीत मुंडे समर्थकांनी केले जंगी स्वागत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ जानेवारी २०२३ । चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरेंना परळी न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. त्या प्रकरणावर आज सुनावणी होती. या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे परळी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांचं राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे समर्थकांकडून जोरदार स्वागत करण्यात आल.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज परळीमध्ये दाखल झाले. परळीत पोहोचताच त्यांचं राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे समर्थकांकडून जोरदार स्वागत झालं. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. सुनावणीनंतर हे वॉरंट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांचं गाव पांगरी आहे, जिथे राज ठाकरे आले आहेत. याच भागामध्ये गोपीनाथगड असून वैजनाथ साखर कारखानाही याच भागामध्ये आहे. या कराड यांचे सुपुत्र या गावचे सरपंच आहेत. त्यांच्याकडून राज ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं आहे. राज ठाकरेंना ५० फुटांचा भव्य हार घालण्यात आला, तसंच जेसीबीच्या माध्यमातून फुलांचा वर्षावही करण्यात आला. त्यांच्या स्वागताची सध्या राज्यभर चर्चा आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम