ठाकरेंच्या दोन नेत्याच्या बोलण्यावर बंदी घालावी ; भाजपच्या आमदाराने दिले पत्र !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २५ सप्टेंबर २०२३ |  राज्यातील भाजप व ठाकरे गटात सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोप अद्याप देखील वाढत चालले असतांना आता भाजप आमदार नीतेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याविरुद्ध विशेषाधिकार भंगाची सूचना विधीमंडळाच्या सचिवांना केली आहे. तसे पत्रही त्यांनी पाठवले आहे.

शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सध्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. मात्र, या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने नार्वेकरांना लक्ष्य केले आहे. संजय राऊत व अंबादास दानवे सातत्याने याविरोधात बोलत असतात. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांविरोधात ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरच नीतेश राणे यांनी आक्षेप घेतला आहे व असे वक्तव्य केल्याप्रकरणी संजय राऊत व अंबादास दानवेंवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

आमदार नीतेश राणे यांनी विधानमंडळ सचिवालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यसभा सदस्य असलेले संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या संदर्भात पुढील वक्तव्ये केली.नीतेश राणे यांनी म्हटले आहे की, अंबादास दानवे व संजय राऊतांच्या अशा स्फोटक भाष्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर एक प्रकारे दबाव टाकण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. यामुळे लोकशाहीच्या हितासाठी या प्रवृत्तीला मुळासकट आळा घालण्यासाठी त्यांच्या बोलण्यावर तात्काळ बंदी आणणे अत्यंत गरजेचे आहे व त्या अनुसार कारवाई करावी.
“संविधान, कायदा व विधीमंडळाशी बेईमानी करुन वेळकाढूपणा चाललाय. घटनात्मक पदावर बसलेले विधानसभा अध्यक्ष घटनाबाह्य सरकारला चालवित आहेत काय?”
“आम्ही करू ते खरं अशी बादशाही विधानसभा अध्यक्ष करीत असतील तर ती बादशाही बुडाल्याशिवाय राहणार नाही.’

“विधानसभा अध्यक्ष फुटले आहेत. ”
तसेच, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही विधानसभा अध्यक्षांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. “उशीरा न्याय देणे हा सुध्दा अन्याय असतो आणि तो अन्याय विधानसभा अध्यक्ष करीत आहेत.”, असे अंबादास दानवे म्हणाले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम