ओवेसेनी दिले राहुल गांधींना आव्हान ; हैदराबादमधून लढवा निवडणूक !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २५ सप्टेंबर २०२३

गेल्या काही महिन्यापासून देशातीली प्रत्येक राज्यात भाजप व विरोधी पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागले असून आता राजकीय पक्षांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी दरम्यान, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना वायडनाडऐवजी हैदराबादमधून निवडणूक लढविण्याचं आव्हान दिलं.

ओवेसी हे त्यांच्या संसदीय मतदार संघ हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, सर्वात जुन्या पक्षाच्या राजवटीत उत्तर प्रदेशचा ढाचा उद्ध्वस्त करण्यात आला. मी तुमच्या नेत्याला (राहुल गांधी) वायनाडमधून नाही तर हैदराबादमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान देतो. तुम्ही मोठमोठी विधाने करण्याऐवजी मैदानात या आणि माझ्याविरोधात लढा. काँग्रेसचे लोक आता काहीही म्हणतील, पण मी तयार आहे, असंही ओवेसी यांनी म्हटलं.

तेलंगणामध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस आणि एआयएमआयएम समोरासमोर दिसत आहेत. दोन्ही पक्षांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी तेलंगणातील तुक्कुगुडा येथील विजयभेरी सभेत सांगितले होते की, भारतीय जनता पक्ष, भारत राष्ट्र समिती आणि एआयएमआयएम तेलंगणात एकजुटीने काम करत आहेत. काँगेस या तिघांच्या विरोधात लढत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम