आजपासून १७ दिवसीय संसदेचे अधिवेशन सुरु !
दै. बातमीदार । २० जुलै २०२३ । देशातील सर्वात मोठे सदन मानले जाणारे लोकसभेचे आजपासून यंदाचे पावसाळी अधिवेशन अनेक अर्थांनी विशेष ठरणार असून पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अधिवेशनात 31 विधेयके मांडली जाणार आहेत. यासोबतच मणिपूर हिंसाचारासह असे अनेक मुद्दे आहेत. ज्यावर संसदेत वाद होण्याची शक्यता आहे.
सिनेमॅटोग्राफी आणि डेटा प्रोटेक्शन विधेयकापासून ते दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांशी संबंधित अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याच्या विधेयकापर्यंत 31 विधेयकं संसदेत मांडली जाणार आहेत. मणिपूर हिंसाचारासह अनेक मुद्द्यांवर संसदेचे पावसाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन 11 ऑगस्टला संपणार आहे. बंगळुरूमध्ये विरोधकांची बैठक आणि दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) कार्यक्रमानंतर पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करणे आणि अलीकडच्या मुद्द्यांवर चर्चा करणे हा या दोन्ही बैठकांचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. अशा स्थितीत हे अधिवेशन महत्त्वाचे ठरणार आहे.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, सरकार प्रत्येक मुद्द्यावर नियमानुसार चर्चा करण्यास तयार आहे. जाणून घ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कोणती विधेयके मांडली जाणार आहेत. डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक: या विधेयकाद्वारे भारतीय वापरकर्त्यांच्या डेटाचा गैरवापर थांबवला जाईल आणि तो कायदेशीर कक्षेत आणला जाईल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम