कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीची कारागृहात घेतला गळफास !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १० सप्टेंबर २०२३ | महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीने कारागृहात जीवन संपवले. जितेंद्र शिंदे असे आरोपीचे नाव आहे. शिंदे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या हत्याकांडातील आरोपी जितेंद्र शिंदे याने पुण्यातील येरवड्या कारागृहातील बराकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.आज पहाटेच्या सुमारास पोलिस गस्तीसाठी गेले असताना हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची अहमदनगर जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी कोर्टाने आरोपीला फाशीची शिक्षा दिली होती. यावेळी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारच्यावतीने पीडितेची बाजू मांडली होती. दरम्यान, कोपर्डीतील पीडित कुटुंबासाठी राज्य सरकारने सकारात्मक पावलं उचलली होती. पीडितेच्या भावाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोकरी दिली होती. कोपर्डीतील निर्भयाच्या भावाला महसूल विभागात नोकरी देण्यात आली होती. तो 2019मध्ये कर्जतच्या तहसीलदार कार्यालयात शिपाईपदावर रूजू झाला होता. शालेय मुलीवर निर्दयीपणे अत्याचार करून राक्षसी वृत्तीने तिचा खून केला, ही घटना कोणाही सामान्य माणसाला संताप आणणारी होती. त्यामुळेच आरोपी नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ यांच्यावर न्यायालयाच्या जुन्या इमारत परिसरात दोनदा हल्ला झाला होती. तर न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या आवारात ‘शिवबा’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सशस्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम