प्रोटोकॉल्स कळत नाही का? राणेंची ठाकरेंवर विखारी टीका !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १० सप्टेंबर २०२३ | आज जळगाव शहरात उद्धव ठाकरे यांची सभेची तयारी सुरु असतांना भाजपचे आ.नितेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

नितेश राणे म्हणाले कि, महाराष्ट्रातला सर्वात मोठा दरोडेखोर, त्याच्याबरोबर खिचडीचोर आणि खंबाटा कामगारांना देशोधडीला लावणारा चोर हे सगळे चोर आणि दरोडेखोर आज एकत्र जळगावच्या दौर्‍यावर आहेत आणि तिथे शासनाच्या आदेशांच्या विरुद्ध शेंबड्या मुलांसारखे नाक रगडायला जाणार आहेत, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी केली आहे.

दरम्यान नीतेश राणे म्हणाले की, ज्या शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण अधिकृतपणे राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी करावे तिथे हे शेंबड्या मुलांसारखे ‘आम्ही आम्ही’ करायला तिथे जाणार आहेत. उद्धव ठाकरे आणि टोळीला दुसर्‍यांच्या बारशामध्ये जाऊन स्वतःची नावं लावण्याची पहिल्यापासून सवय आहे. त्यांचे स्वतःचे कार्यक्रम संपलेले आहेत, त्यामुळे दुसर्‍यांच्या घरात काय चालले यावरच यांचे कार्यक्रम ठरतात. राज्याचा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला प्रशासन आणि प्रोटोकॉल्स कळत नाही का? असा खडा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. कायदा आणि सुव्यवस्थेत स्वतः बिघाड करायचा आणि मग उगाच गृहमंत्र्यांच्या नावाने बोंबलत बसायचे, हेच या टोळीचे काम आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम