वनडे वर्ल्डकपसाठी संघ ठरला ; या खेळाडूंना मिळणार संधी !
बातमीदार | ३ सप्टेंबर २०२३ | येत्या ५ ऑक्टोबरपासून भारतात वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार रंगणार असून या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंनी आपल्या संघातील खेळाडूंची यादी जाहिर करायला सुरुवात केली आहे.आता भारतीय संघाच्या खेळाडूंची यादी देखील जवळ जवळ तयार झाली आहे. मात्र बीसीसीआयकडून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
माध्यमातील वृत्तानुसार, संजू सॅमसनला या संघात स्थान मिळालेलं नाही. त्याला आशिया चषकासाठी देखील राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान दिलं गेलं आहे. इंडीयन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने आगामी वर्ल्डकपसाठी १५ सदस्यीय संघ निवडला आहे. या संघातून संजू सॅमसनला वगळण्यात आले आहे. तर केएल राहुलला संघात स्थान देण्यात आले आहे.
एकटा संजू सॅमसन नव्हे तर तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णाला देखील या संघात स्थान मिळू शकलेलं नाही. या संघात कर्णधार रोहित शर्मासह शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली आहे. या वृत्तानुसार, संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून रविंद्र जडेजा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूरचा समावेश करण्यात आला आहे. तर वेगवान गोलंदाज म्हणून अनुभवी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजला संधी दिली गेली आहे. तर फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते.
आगामी वनडे वर्ल्डकपसाठी येत्या ५ सप्टेंबरपर्यंत भारतीय संघाची घोषणा करायची आहे. आतापर्यंत केएल राहुलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह होतं. मात्र तो आता पूर्णपणे फिट असल्याचं म्हटलं जातं आहे. इंडीयन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली,सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर,जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम