अभिनेत्रीने प्रेमासाठी दिला होता अभिनयाला ब्रेक पण पुन्हा सज्ज !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | १३ सप्टेंबर २०२३ | मागच्या काही महिन्यांपासून टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. देवोलीनाने तिचा जिम ट्रेनर आणि बॉयफ्रेंड शाहनवाज शेखसोबत लग्न केले. लग्नानंतर देवोलीनाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मागच्या काही दिवसांपासून तिने अभिनयातून ब्रेक घेतला होता. आता देवोलिना पुन्हा एकदा कमबॅकसाठी सज्ज झाली आहे.टीव्ही सीरियल ‘साथ निभाना साथिया’मधील देवोलिना भट्टाचार्जीने गोपी बहूची प्रसिद्ध व्यक्तिरेखा साकाराली होती. या भूमिकेमुळे देवोलिना घराघरात पोहोचली.

देवोलिनानेही हे पात्र तिच्या पद्धतीने अगदी जीव ओतून साकारले आणि खूप लोकप्रियता मिळवली. मात्र, काही वेळानंतर देवोलिना भट्टाचार्जीने हा लोकप्रिय शो सोडला. आता देवोलिना पुन्हा एकदा पडद्यावर परतण्यास सज्ज झाली आहे. देवोलिनाला प्रसिद्ध टीव्ही सीरियल ‘दिल दियां गल्लन’मध्ये कास्ट करण्यात आले होते.

या मालिकेत देवोलिना भट्टाचार्जी ‘दिशा’ची भूमिका साकारणार आहे.’ही’ होती भारतातील सर्वांत श्रीमंत अभिनेत्री, 28 किलो सोन्याची होती मालकीणमुस्लिम बॉयफ्रेंडसोबत लग्न करून झाली ट्रोलदेवोलिना भट्टाचार्जी टीव्ही जगतातील एक मोठी स्टार आहे. देवोलिनाचे प्रसिद्ध पात्र गोपी बहू आजही तिच्या कारकिर्दीतील सर्वात चमकदार पात्र मानले जाते. देवोलिनाने नुकतेच तिचा जिम ट्रेनर आणि बॉयफ्रेंड शाहनवाज शेखसोबत लग्न केले होते. मुस्लिम बॉयफ्रेंडसोबत लग्न केल्यामुळे चाहत्यांनी देवोलिनाला खूप ट्रोल केले. पण देवोलिना तिच्या प्रेमापुढे ठाम राहिली. देवोलिनानेही अनेकदा ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले.बिग बॉसचा भागही राहिली देवोलिना भट्टाचार्जी हे टीव्ही जगतातील एक मोठे नाव असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. आता देवोलिना लवकरच ‘दिल दिया गल्लन’मध्ये दिसणार आहे. देवोलीना टीव्ही मालिकांसह अनेक रिअॅलिटी शोचा भागही आहे.

देवोलिना बिग बॉसची स्पर्धकही राहिली आहे. देवोलिना भट्टाचार्जी बिग बॉसच्या 13व्या सीझनमध्ये दिसली होती. आता पुन्हा एकदा ती पडद्यावर दिशाची भूमिका साकारणार आहे. देवोलीना या मालिकेसाठी खूप उत्सुक दिसत आहे.शोमध्ये कास्ट झाल्यानंतर देवोलिना भट्टाचार्जीने ETimes शी संवाद साधला. ज्यामध्ये देवोलिना म्हणाली, ‘शोमध्ये कास्ट झाल्याने मला खूप आनंद झाला आहे. मी देखील नवीन सुरुवातीबद्दल खूप उत्सुक आहे. मी लवकरच लोकांसमोर येणार आहे. माझ्या या व्यक्तिरेखेला लोक तितकेच प्रेम देतील अशी आशा आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम