किचनमधील दोन पदार्थ देणार मूळव्याधीपासून पूर्णपणे आराम !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १३ सप्टेंबर २०२३ | अनेकांना अचानकपणे आजारपण उदभवत असते तर काही आजार व्यक्ती कुणालाही सांगत नसतो पण जर हेच आजार जास्त दिवस उपचार झाले नाही तर त्याचा मोठा त्रास होत असतो. खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी आणि चुकीची जीवनशैली अनेक आजारांना कारणीभूत ठरत आहे. यामध्ये मूळव्याधचाही समावेश आहे. मूळव्याध ही एक समस्या आहे, ज्याबद्दल लोक सांगण्यास कचरतात.

अनेकदा पाईल्सच्या समस्येमुळे लोक खूप चिंतेत राहतात. मूळव्याध असलेल्या लोकांना मल पास करताना खूप अस्वस्थ वाटते. या कारणामुळे गुदद्वारात वेदना आणि सूज यासारख्या परिस्थितींना तोंड द्यावे लागते.मूळव्याधपासून सुटका मिळवण्यासाठी लोक बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांचा अवलंब करतात. मात्र अनेकवेळा त्यांना यातून कोणताही लाभ मिळत नाही.
अशा परिस्थितीत लिंबू आणि दुधाचे मिश्रण तुम्हाला मदत करू शकते. आयुर्वेदाचार्य डॉ जितेंद्र शर्मा यांच्याकडून जाणून घेऊया मुळव्याध मध्ये दूध आणि लिंबू कसे वापरावे?मुळव्याधमध्ये लिंबू कसे फायदेशीर?लिंबू आणि दुधाचे सेवन मूळव्याधसाठी खूप गुणकारी मानले जाते. वास्तविक मूळव्याधग्रस्तांना मल जाण्यास खूप त्रास होतो. अशा स्थितीत लिंबू सेवन केल्याने आतड्याची समस्या कमी होते.

यासोबतच लिंबाच्या रसामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे गुदद्वारातील सूज आणि वेदना कमी होऊ शकतात. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून मल पास करताना कोणतीही अडचण येणार नाही.मुळव्याधमध्ये दूध किती फायदेशीर?मुळव्याधची समस्या असल्यास दूध किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तू टाळल्या पाहिजेत. कारण दूध किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते.

मात्र मूळव्याधपासून आराम मिळविण्यासाठी, आपण थंड दूध, दही आणि कच्चे दूध घेऊ शकता. त्याच्या सेवनाने हानी होण्याची शक्यता खूपच कमी असते.दूध आणि लिंबू कसे सेवन करावे?तज्ज्ञांच्या मते, मुळव्याधची समस्या टाळण्यासाठी दूध आणि लिंबाचा वापर करणे खूप सोपे आहे. या दोन्ही गोष्टी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी सेवन कराव्यात. लिंबाचा रस आणि दुधाचे सेवन करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास थंड दुधात एक लिंबू पिळून घ्या. यानंतर हे मिश्रण सेवन करा. असे केल्याने मुळव्याधची समस्या दूर होण्यास मदत होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम