प्रशासकांनी केले व्हर्टिकल गार्डन कामाचे कौतुक

advt office
बातमी शेअर करा...

 

औरंगाबाद दि 7 सप्टेंबर  |  निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन निमित्त प्रशासकांनी भगवान महावीर चौक उड्डाण पुलाखाली उभारण्यात आलेले व्हर्टिकल गार्डन, नागेश्वर वाडी रस्त्यावरचे पूल आणि वज्ड मेमोरियल हॉल मनपा मुख्यालय जवळ पुलावर जाळ्यांवर उभारण्यात आलेले व्हर्टिकल गार्डन ची पाहणी केली. यावेळी भगवान महावीर चौक येथे त्यांनी कारंजेची देखील पाहणी केली.

यावेळी त्यांनी मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील आणि कनिष्ठ अभियंता गोपीचंद चांडक यांनी केलेल्या कामांचे कौतुक केले व त्यांना शाबासकी दिली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त बि भा नेमाने, शहर अभियंता एस डी पानझडे, घन कचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव ,उप अभियंता आर एन संधा, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील,माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद, कनिष्ठ अभियंता चांडक व संबंधित वॉर्ड अधिकारी यांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम