राज्यातील मोठा नेता राष्ट्रवादीच्या तंबूत येणार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ एप्रिल २०२३ ।  दोन दिवस राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार नॉट रिचेबल झाल्यानंतर सत्ताधारीसह विरोधक खळबळले होते पण दुसऱ्यादिवशी अजित पवार यांनी माध्यमासमोर येत प्रतिक्रिया दिल्यावर राष्ट्रवादीचा जीव भांड्यात पडला होता. आता राष्ट्रवादीने मोठी खेळी करीत एक मोठा नेत्याचा पक्षप्रवेश करण्याच्या तयारीत आहे.

स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असून राष्ट्रवादीशी घरोबा करणार असल्याचं बोललं जातंय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी रविकांत तुपकर यांची बुलढाण्यात जाऊन भेट घेतली आहे. एकनाथ खडसे आणि रविकांत तुपकर यांच्यात एक तास बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे बुलढाण्यात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे आज बुलढाणा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी आले होते. या दरम्यान त्यांनी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या कार्यालयाला भेट दिली.

यावेळी रविकांत तुपकर आणि एकनाथ खडसे यांच्यात जवळपास एक तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा बुलढाण्यात रंगू लागली आहे. यावर रविकांत तुपकर यांना विचारलं असता त्यांनी सध्या काही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. एकनाथ खडसे आणि रविकांत तुपकर यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे समोर येणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर आणि स्वाभिमानीचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांच्यात गेल्या वर्षभरापासून मतभेद असल्याच्या रंगल्या होत्या. त्यामुळे रविकांत तुपकर हे नाराज असल्याचं अनेकदा समोर आलेलं आहे. या कारणामुळे रविकांत तुपकर हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत का? असा प्रश्न निर्माण झालाय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम