सर्वात मोठी कारवाई : NCB आणि नौदलाने केले इतक्या कोटीचे ड्रग्स जप्त !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ मे २०२३ ।  देशात नेहमीच भारतीय नौदल आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो नेहमीच मोठ मोठ्या कारवाई करीत असतात पण आजपर्यतची सर्वात मोठी कारवाई आज केली आहे. तब्बल १२ हजार कोटी ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इराणमधून 12 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज भारतात आणले जात होते. दरम्यान, माहितीच्या आधारे नौदल आणि एनसीबीने ही खेप गुजरातच्या बंदरात पोहोचण्यापूर्वीच पकडली. यादरम्यान ड्रग्ज माफियालाही अटक करण्यात आली आहे. नौदल आणि एनसीबीने केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये अरबी समुद्रात आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग्जची खेप पकडली आहे. 2600 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारानुसार या ड्रग्सची किंमत 12,000 कोटी रुपये आहे.
2600 किलो ड्रग्जसह पकडलेल्या माफियाला कोचीच्या बंदरात नेण्यात आले, जिथे एनसीबी आणि नौदल पुढील तपास करत आहे. आता या संपूर्ण ड्रग्ज रॅकेटमध्ये कोणाचा हात आहे, याचा शोध घेतला जात आहे.भारतीय नौदलाच्या नेव्हल इंटेलिजन्स युनिटला एक इनपुट मिळाले होते. काही ड्रग माफियांना अरबी समुद्रमार्गे भारताच्या कोणत्याही सागरी किनार्‍यावर अमली पदार्थ पोहोचवायचे आहेत, असे त्यात म्हटले होते. या इनपुटच्या आधारे नौदल आणि एनसीबीने संयुक्त कारवाई करून कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्जची खेप पकडली. नौदलाच्या जहाजाने अरबी समुद्र परिसरात कारवाई केली आहे. अधिकाऱ्यांनी एका ड्रग्ज माफियालाही अटक केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम