
कर्नाटकात या कारणाने भाजपला बसला फटका ; उपमुख्यमंत्री फडणवीस !
दै. बातमीदार । १४ मे २०२३ । कर्नाटक निवडणुकीमध्ये कॉंग्रेसने भाजपला आसमान दाखविले आहे. अशा निकाल पूर्णपणे लागला असून आता कॉंग्रेस पक्ष या राज्यात सत्ता स्थापन करणार आहे. त्यावर अनेक देशातील अनेक नेत्यांची प्रतिक्रिया समोर येवू लागली आहे. राज्यातील उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता यावर भाष्य केले आहे.
नागपुरात पत्रकाराशी बोलतांना फडणवीस म्हणाले कि, कर्नाटकमध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. तसेही कर्नाटकमध्ये १९८५ नंतर कुठलेही सरकार रिपीट होत नाही. २०१८ मध्ये आम्हाला जितकी मते मिळाली त्यात काही पॉइंटने कमी झाली; पण जागा कमी झाल्या. ‘जेडीएस’ची पाच टक्के मते कमी होऊन ती काँग्रेसला गेली. त्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या, असे विश्लेषण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कर्नाटक जिंकल्याने काही लोकांना देश जिंकले असं वाटत आहे; पण त्यांनी आधीच्या निवडणुकीचे निकाल बघितले पाहिजे. वाॅर्डाच्या निवडणुकीत आम्ही हरलो तरी त्यांना शाह-मोदींचा पराभव दिसतो. ‘बेगाने की शादी में अब्दुल्ला दीवाना’ अशी काही लोकांची स्थिती आहे. शरद पवारांना तर कर्नाटकमध्ये एक जागाही मिळाली नाही. मतदारांनी ऐकले आणि राष्ट्रवादीचे पार्सल वापस पाठविले, अशी टीकाही फडणवीस यांनी पवार यांच्यावर केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम