छावणी पोलीस व माणुसकी समुहाने दिला महिलेला व मुलाला न्याय

बोधी वह सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थे कडुन मदतकार्य

बातमी शेअर करा...

औरंगाबाद दि १ सप्टेबंर | आपल्या घरातील स्त्री बाहेर गेली आणि घरी परत यायला तिला उशिर झाला की आपला जीव कासाविस होतो.रात्री अपरात्री काही झालं तर ? मात्र ती घरात सुखरूप आल्या नंतर आपली काळजी संपते.घरातल्या चार भिंतींच्या मर्यादेत ती सुरक्षित असते.पण अशाच असुरक्षित व धोक्याच्या कित्येक स्त्रिया रात्री भटकत असतात;ती कुणाची तरी आई, मुलगी, अथवा पत्नी,किंवा बहीण असेल.पण त्यांची वाट पाहणारं असं कुणीच नाही.अशा अनेक महिला ज्यांना त्यांच्या जवळच्या आपल्या लोकांनीच व समाजाने देखील सोडून दिलं आहे.कारण त्या आजारी आहेत,औरंगाबाद शहरात मध्यवर्ती बस्थानक परीसरात गेल्या दोन दिवसापासून बेवारस अवस्थेत फिरत होते तीची तब्येत खुप खराब होती ती चक्कर येवुन खाली पडली मुलानी जमलेल्या लोकानकडे मदत मांगीतली पन कोन्हालाच किव आली नाही एक रीक्षा चालक नामे शेख अकबर मदतीसाठी पुढे आला त्याने वीचारपुस केली असता त्या महिलेने आपली आपबिती सांगीतली. मी गेल्या तीन वर्षापासून आजाराने त्रस्त आहे दीड महिन्यापासून घाटी रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरू आहेत परंतु माझी तब्येत खूप सिरीयस असल्याकारणाने माझ्याजवळ रुग्णालयात कोणीच थांबायला तयार नाही माझा नववर्षाचा मुलगा माझ्यासोबत घाटीत राहतो मी माझे पती सतीश सोनवणे राहणार बाजार सावंगी हे मला कुठला सहारा देत नाही माझ्यावर अत्याचार करतात मारहाण करतात घरातून हाकलून देतात मला जेवायला सुद्धा देत नाही मला एक मुलगी व दोन मुले आहेत माझा नवरा मुलांनाही मारहाण करतो दारू पिऊन शिवीगाळ करतो मी गेल्या तीन वर्षापासून त्रास सहन करत आहे मला बसल्या देखील जात नाही एवढा त्रास आहे माझ्या नवऱ्याने मारहाण केल्यानंतर मी माझ्या नववर्षीय मुलाला घेऊन त्रासाला कंटाळून औरंगाबादला आले शासकीय रुग्णालयात उपचार घेतला त्यावेळेस माझे आई-वडील माझ्यासोबत काही दिवस होते परंतु आता आई-वडील सुद्धा येत नाही शेवटि मी आज आत्महत्या करण्याचे ठरवले आहे आम्ही माय लेक रेल्वे खाली जीव देते रीक्षा चालक याने आपल्या रिक्षात बसवुन औरंगाबाद छावणी येथील चर्च मध्ये राहता येते असे सांगुन घेवून आला.चर्च मध्ये ठेवता येत नसल्याचे व्यवस्थापक यांनी सांगितले छावणी पोलीस स्टेशनमध्ये जानाचा सल्या दिला.पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर साय्यक पोलीस निरिक्षक पी.एस.भागीले

यांना रिक्षा चालक याने सदर महिले संदर्भात सविस्तर माहिती दिली असता तीची पोलीसांनी विचारपूस केली तर तीचा ९ वर्षीच्या मुलाने रडत सांगितले की पप्पा आम्हाला सांभाळत नाही आई ला मारतात दारु पीवुन येतात व आम्हालाहि मारतात आई बाबाचे खूप भांडन झाले आई एकटिच चालली होती तीला उभहि राहता येत नाही मी एकटाच आई जवळ दवाखान्यात होतो.म्हणून मी आईसोबत दवाखान्यात आलो आम्ही काय करायचे साहेब असे सांगितले पी.एस.भागीले यांनी बेवारस निराधारांच्या मदतीला नेहमी धावून येणारे समाजसेवक सुमित पंडित यांना सदरील महिलेची माहिती दिल्यावर त्यांनी स्वतः येऊन रुग्णाची आस्थेवाईकपणे विचारपूस केली आणि धिर दिला. त्या मुलाने माहिती दिली की,आत्महत्या एकच पर्याय उरला आहे मी रेल्वे खाली जीव देते.आम्हाला कोन्हिच साथ देत नाही ना नवरा ना माय बाप मी दोन मुले घरी सोडून आली आहे.

माझ्या आजारपनामुळे या मुलाचे शिक्षण सुध्दा देता येत नाही कस जीवन जगु आम्ही आता तुम्हिच सांगा सुमित पंडित यांनी ही बाब छावणी पोलिस स्टेशनचे साय्यक पोलीस निरीक्षक पी.एस भागीले यांना सांगितली.श्री भागीले यांनी यांनी या महिलेला मदत करू आणि तिचे पुनर्वसन करू म्हणून सुमित पंडित यांच्याशी चर्चा करून या महिलेची राहण्याची व्यवस्था माणुसकी वृध्द सेवालय धोपटेश्वर फाटा जटवाडा रोड येथील समाजसेविका पुजा पंडित संचलित माणुसकी वृद्धाश्रम येथे पुनर्वसन करण्याचे ठरविले त्यासाठी माणुसकी टिम आणि पोलिसांनी काही रक्कम जमा करून खाजगी वाहनांनी या माय लेकांना माणुसकी वृध्द सेवालय येथे पाठविण्याची व्यवस्था केली. आणि त्या मुलाच्या शिक्षणाची पण व्यवस्था करण्याचे आश्वासन सुमित यांनी दिले मुळ धोपटेश्वर फाटा जटवाडा रोड येथे त्यांना हक्काचा निवारा मीळाल्याने कृतांत ने आनदाश्रु येत आभार मानले. या सामाजिक कार्यासाठी पोलीस निरिक्षक शरद इगळे छावणी,साय्यक पोलीस निरिक्षक,पी.एस भागीले,छावणी महिला पोलीस कर्मचारी व

माणुसकी समुहाचे समाजसेवक सुमित पंडित,सौ.रंजना प्रशांत दंदे ,समाजसेविका पुजा पंडित,आदिंनी मदतकार्य केले.

 

आतापर्यंत माणुसकी टिम ने कितीतरी बेसहारा महिलांना न्याय दिला आहे

 

माणुसकी समूह आता सामाजिक दायित्व साठी आणि सामाजिक कर्तव्य स्वीकारण्यासाठी एक समानार्थी शब्द बनलेला आहे.ती भगिनी आजाराने पीडित आहेत.हा तीचा गुन्हा आहे का ? समाजाने वाळीत टाकलेल्या ह्या महिलांवर शारीरिक आत्याचार होत नसतील का ? अमानुष लोकांच्या वासनेच्या शिकार झालेल्या ह्या महिलांपासून जन्माला आलेल्या अनाथ मुलांचा भार कोणी सांभाळावा? हे प्रश्न कायम समाजाला विचारल्या जात आहे,आणि कोणीही कायमस्वरूपी ह्यावर उत्तर द्यायला तयार नाही.मग यांच्यासाठी एक मायेचं आपुलकीचं घर आहे का ? यांना असच उकिरड्यावर ठेवायचे काय ? समाजाच दायित्व काहीच नाही का ? हे देखील आधी सामान्य जीवन जगत होते. जीवनात संकट सांगुन येत नसतात. पण ज्या सामाजिक संस्था अशा बेवारस फिरणाऱ्या मनोरुग्णांसाठी काम करतात त्यांना मदत करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी उद्योजकांनी समाजबांधवांनी समोर येणे अत्यंत गरजेचे ठरते. या मदतीतून आपण या जीवन अधिक सुसह्य करू शकतो. आणि समाजाची खरी मानसिक विकृती नष्ट होईल.

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम