केंद्र सरकारने केली 14 मोबाइल अॅप्लिकेशन्स ब्लॉक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ मे २०२३ ।  गेल्या काही वर्षांत, केंद्र सरकारने सुमारे 250 चिनी अॅप्सवर ‘हिंदुस्थानचे सार्वभौमत्व आणि अखंडता, हिंदुस्थानचे संरक्षण, राज्याची सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांच्यासाठी धोका’ असल्याचे कारण देत बंदी घातली आहे. जून 2020 पासून, सरकारने 200 हून अधिक चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे, ज्यात TikTok, Shareit, WeChat, Helo, Likee, UC News, Bigo Live, UC Browser, Xender, Camscanner, PUBG Mobile आणि Garena Free Fire सारख्या लोकप्रिय मोबाइल गेम्सचा समावेश आहे. आता केंद्र सरकारने जम्मू आणि कश्मीरमध्ये माहिती प्रसारित करण्यासाठी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांकडून कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म म्हणून वापरले जाणारे 14 मोबाइल अॅप्लिकेशन्स ब्लॉक केले आहेत.

इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. बंदी घालण्यात आलेल्या मेसेंजर ऍप्लिकेशन्समध्ये Crypviser, Enigma, Safeswiss, Wickrme, Mediafire, Briar, BChat, Nandbox, Conion, IMO, Element, Second line, Zangi आणि Threema यांचा समावेश आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि कश्मीर केंद्रशासित प्रदेशातील ओव्हरग्राउंड कामगार आणि इतर कार्यकर्त्यांना कोडेड संदेश पाठवण्यासाठी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी या अॅप्लिकेशन्सचा वापर केला होता. देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणार्‍या मोबाईल ऍप्लिकेशन्सवरील कारवाई नवीन नाही कारण सरकारने यापूर्वी अनेक चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम